12 तारखेची हिंसा डिलीट करून 13 तारखेच्या घटनेवर जोर का दिला जात आहे?, यशोमती ठाकूर गप्प का?; देवेंद्र फडणवीसांचा सवाल
राज्यातील काही भागात 12 तारखेला हिंसा भडकली. त्याची रिअॅक्शन 13 तारखेला उमटली. पण 12 तारखेची घटना डिलीट करून 13 तारखेच्या घटनेवर अधिक जोर दिला जात आहे.
अमरावती: राज्यातील काही भागात 12 तारखेला हिंसा भडकली. त्याची रिअॅक्शन 13 तारखेला उमटली. पण 12 तारखेची घटना डिलीट करून 13 तारखेच्या घटनेवर अधिक जोर दिला जात आहे. 12 तारखेच्या घटनेवर का बोललं जात नाही? या हिंसेमागे कोण होतं? अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर त्यावर गप्प का आहेत? असे सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.
देवेंद्र फडणवीस यांनी आज अमरावतीतील हिंसेचाराचा आढावा घेतला. त्यानंतर या हिंसाचारात नुकसान झालेल्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्ला चढवला. 13 तारखेची घटना ही 12 तारखेच्या घटनेची रिअॅक्शन होती. पण कोणत्याही हिंसेचं समर्थन करत नाही. 12 तारखेची घटना डिलीट करून 13 तारखेच्या घटनेवर बोलत आहेत. सर्व कारवाई 13च्या घटनेवर सुरू आहे. 12च्या घटनेवर काहीच कारवाई नाही. त्यावर कोणताही नेता बोलत नाही. पालकमंत्री यशोमती ठाकूरही बोलत नाही. विशिष्ट धर्माच्या लोकांना टार्गेट करणं आम्हाला मान्य नाही. पण चुकीच्या घटनेचं लांगूलचालन होत असेल तर आम्हाला मान्य नाही, असं सांगतानाच 12 तारखेच्या घटनेवर सत्ताधाऱ्यांनी चिडीचूप भूमिका घेतली आहे. त्याचं कारण काय? मतांचं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न तर नाही ना? ही शंका वाटते, अशी शंका फडणवीस यांनी व्यक्त केली.
तर जेलभरो करू
12 तारखेची घटना डिलीट करून 13 तारखेच्या घटनेला जे जबाबदार नाही, पण ते हिंदुत्ववादी संघटनेशी संबंधित आहेत. म्हणून टार्गेट केलं जातं आहे. याद्या करून टार्गेट केलं जात आहे हा आमचा आरोप आहे. आम्ही पोलिसांसोबत बैठक घेतली. आम्ही सहकार्य करायला तयार आहोत. आम्हालाही शांतता हवी. दंग्यांनी काही होत नाही. पण राजकीय दबावाखाली पोलीस एकतर्फी कारवाई करत असेल तर आम्हाला निषेध करावा लागेल, विरोध करावा लागेल. नाहीतर जेलभरो आंदोलन करू. खोट्या गुन्हा्यात टाकायचे असेल तर आम्हीच तुरुंगात येतो. एकतर्फी कारवाई बंद करा, असं सांगतानाच या घटनेची गृहमंत्र्यांना माहिती दिली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
एकाच वेळी वेगवेगळ्या शहरात मोर्चे कसे निघतात?
जी गटना घडली नाही त्यावर मोर्चा काढण्यात आला. चुकीच्या माहितीवर आधारीत मोर्चा काढण्यात आला. कुराण शरीफ जाळण्यात येत असल्याचा व्हिडिओ दाखवण्यात आला. पण तो व्हिडीओ दिल्लीच्या कॅम्पमधील होता. त्याचवेळी पाकिस्तानातील फोटो व्हायरल केले गेले. एक नरेटिव्ह तयार करण्याकरिता समाजाला भडकवण्यता आलं. एवढे मोठे मोर्चे राज्याच्या वेगवेगळ्या शहरात निघतात हे आता ठरवलं आणि निघाले असं होत नाही. हे वेल प्लॅन्ड मोर्चे होते. नियोजित मोर्चे होते. एकाच वेळी एकाच दिवशी हे मोर्चे निघाले. त्यावरून हा सुनियोजित कट होता हे दिसून येते. त्यामुळे फेक न्यूजच्या आधारे मोर्चे कोणी काढले? त्याची चौकशी करा. त्यांची या मागची भूमिका काय होती हे सत्य समोर येऊ द्या, अशी मागणी त्यांनी केली.
दंगलीमागे कट होता का? चौकशी करा
राज्यात दंगल भडकणव्यासाठी तयार करण्यासाठीचा कट होता का त्याची चौकशी व्हावी. 12 तारखेला असाच मोर्चा अमरावतीत निघाला. त्याला परवानगी होती की नाही? होती तर कुणी दिली? ज्यांनी परवानगी दिली त्याने काय विचार करून दिली? त्याची चौकशी झाली पाहिजे. परतीच्या वेळी समाजकंटकांनी दुकाने टार्गेट केली. लोकांना टार्गेट केलं. यातून दंगा घडवायचा होता. त्यामुळे विशिष्ट धर्माच्या दुकानांना घरांना व्यापाऱ्यांना टार्गेट करण्यात आलं, असा दावाही त्यांनी केला.
National Fast News | फास्ट न्यूज | 9.30 PM | 20 November 2021 pic.twitter.com/HboJiYJTdx
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 20, 2021
संबंधित बातम्या:
देवेंद्र फडणवीसांचा अमरावती दौरा; व्यापाऱ्यांशी चर्चा करून नुकसानाचा घेतला आढावा
एकतर्फी कारवाई केली तर जेलभरो आंदोलन करू, अमरावती हिंसाचारप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांचा इशारा