Devendra Fadnavis Swearing-in : फडणवीसांचा ‘महा’शपथविधी सोहळा; पहिल्या रांगेत काँग्रेसचा हा दिग्गज नेता, अंबानींसह आणखी कोण कोण?

आज देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. मुंबईच्या आझाद मैदानात या शपथविधी सोहळ्याची भव्य अशी तयारी करण्यात आली आहे. या शपथविधी सोहळ्याला विविध क्षेत्रातील दिग्गज उपस्थित राहणार आहेत.

Devendra Fadnavis Swearing-in : फडणवीसांचा 'महा'शपथविधी सोहळा; पहिल्या रांगेत काँग्रेसचा हा दिग्गज नेता, अंबानींसह आणखी कोण कोण?
Follow us
| Updated on: Dec 05, 2024 | 5:18 PM

आज महायुती सरकारचा शपथविधी सोहळा आहे. या ‘महा’ शपथविधी सोहळ्यात देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. मुंबईच्या आझाद मैदानात या सोहळ्याचं भव्य असं आयोजन करण्यात आलं आहे. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि इतर केंद्रीय मंत्री उपस्थित राहणार आहेत. 22 राज्याचे मुख्यमंत्री देखील या शपथविधी सोहळ्यासाठी मुंबईत येणार आहेत.  तब्बल चाळीस हजार नागरिक या सोहळ्याला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. शपथविधी सोहळ्यासाठी लाडक्या बहिणींना विशेष निमंत्रण देण्यात आलं आहे. या सोहळ्याला विविध क्षेत्रातील दिग्गज आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. दरम्यान पहिल्या रांगेत कोण- कोण बसणार याबाबत आता माहिती समोर आली आहे.

पहिल्या रांगेत आसन व्यवस्था असलेल्या दिग्गजांची नावं 

अंबानी कुटुंबीय देवेंद्र फडणवीस यांचे कुटुंबीय पृथ्वीराज चव्हाण अशोक चव्हाण अंबादास दानवे निलम गोरहे नारायण राणे उदयनराजे भोसले राम नाईक

दुसऱ्या रांगेत आसन व्यवस्था असलेल्या दिग्गजांची नावं 

मर्चंट कुटुंबीय कुमार बिर्ला अजय पिरामल उदय कोटक शाहरुख खान सलमान खान सचिन तेंडुलकर अंजली तेंडुलकर दिलीप संघवी अनिल अंबानी रणबीर कपूर रणवीर सिंह गीतांजली किर्लोस्कर बिरेंद्र सराफ अनिल काकोडकर

दरम्यान महायुतीच्या नव्या सरकारमध्ये देखील जुनाच पॅटर्न कायम ठेवण्यात आला आहे. नव्या सरकारमध्ये देखील एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असणार आहेत. आज देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. तर अजित पवार हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. दुसरे उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हे शपथ घेणार का याबाबत सस्पेन्स होता. मात्र सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार आता एकनाथ शिंदे यांच्या मनधरणीला यश आलं असून, ते देखील आज देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासोबत शपथ घेणार आहेत.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.