VIDEO | देवेंद्र फडणवीसांच्या भरधाव वेगात असलेल्या ताफ्यातील गाडीला आग, सुदैवाने इजा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ताफ्यातील एका गाडीने अचानक पेट घेतला. सुदैवाने यात कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही. (Devendra Fadnavis vehicle convoy caught fire in chandrapur)

चंद्रपूर : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यातील एका गाडीला आग लागल्याची घटना घडली आहे. नागपूरकडून मूलकडे येत असताना ही घटना घडली आहे. यावेळी देवेंद्र फडणवीसांच्या ताफ्यातील एका गाडीने अचानक पेट घेतला. सुदैवाने यात कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही. (Devendra Fadnavis vehicle convoy caught fire in chandrapur)
भरधाव वेगात असलेल्या गाडीला अचानक पेट
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यातील पोलीस गाडीला ही आग लागली होती. काल सकाळी नागपूर येथून त्यांच्या मूळ गावी मूलकडे येत असताना ही घटना घडली आहे. चंद्रपूर-नागपूर जिल्ह्याच्या सीमेवरील नागभीड तालुक्यातील मोहाडी येथे भरधाव वेगात असलेल्या गाडीने अचानक पेट घेतला.
सुदैवाने इजा नाही
यापूर्वी त्या गाडीच्या बोनेटमधून धूर येत होता. त्यामुळे गाडीतील सुरक्षारक्षक खाली उतरले. त्यामुळे सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही. या घटनेनंतर फडणवीस यांनी आपला दौरा सुखरूपपणे पूर्ण केला.
पाहा व्हिडीओ :
(Devendra Fadnavis vehicle convoy caught fire in chandrapur)
चंद्रकांत पाटील म्हणाले अमित शाहांना पत्र लिहिणार, उदय सामंत म्हणतात हा तर सहकार मोडण्याचा डावhttps://t.co/Qm6FsM9IPd#ChandrakantPatil | #UdaySamant | #SugarMill | #Ajitpawar | @samant_uday
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 3, 2021
संबंधित बातम्या :
VIDEO | बीडमध्ये ‘द बर्निंग कार’चा थरार, ड्रायव्हरच्या प्रसंगावधानामुळे तिघे थोडक्यात बचावले
VIDEO | मुंबई-नाशिक महामार्गावर ‘द बर्निंग कार’चा थरार, भर रस्त्यात चालती गाडी पेटली