मोदींना मागे टाकून पंतप्रधान बनायचं फडणवीस यांच्या डोक्यात सुरू होतं; संजय राऊत यांच्या नव्या गौप्यस्फोटाने खळबळ
आदित्यला ग्रूम करून अडीच वर्षांनी मी दिल्लीला केंद्रात जाईन असे २०१९ मध्ये फडणवीस म्हणाले होते, असा दावा उद्धव ठाकरेंनी केला होता. त्यावरून सध्या आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण रंगलं आहे. उद्धव ठाकरेंचा हा दावा फडवीसांनी फेटाळून लावला. मात्र आता शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरेंचा तो दावा खरा असल्याचे राऊतांनी स्पष्ट केले.
आदित्यला ग्रूम करून अडीच वर्षांनी मी दिल्लीला केंद्रात जाईन असे २०१९ मध्ये फडणवीस म्हणाले होते, असा दावा उद्धव ठाकरेंनी केला होता. त्यावरून सध्या आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण रंगलं आहे. उद्धव ठाकरेंचा हा दावा फडवीसांनी फेटाळून लावला. मात्र आता शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरेंचा तो दावा खरा असल्याचे राऊतांनी स्पष्ट केले.
हे पूर्णपणे खरं आहे. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले, त्यानंतर त्यांना पंतप्रधानपदाची स्वप्न पडू लागली होती. मोदीजींच्या जागेवर आता मी जाईन, असंही त्यांना वाटत होतं, असा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केला. पहिले त्यांना गृहमंत्री पदाचंही स्वप्न पडलं. त्यांच्या या राजकीय महत्वाकांक्षेमुळेच तर त्यांचे पंख छाटून फडणवीसांना उपमुख्यमंत्री बनवण्यात आलं, असे राऊत म्हणाले.
मी पंतप्रधान बनणार, माझं (राजकीय) वजन आता इतक वाढलंय की मी योगींना, मोदीजींना मागे हटवून पंतप्रधान बनेन, अशी स्वप्न फडणवीसांना पडू लागली होती, पण मोदी शहांनी त्यांचे पंख छाटून, राज्यात बसवलं असा दावा संजय राऊत यांनी केला. उद्धव ठाकरेंनी जे विधान केलं ते खरं होतं, ते कधीच खोटं बोलत नाहीत, असंही राऊत म्हणाले.
काय आहे प्रकरण ?
उद्धव ठाकरे म्हणाले होते की, “देवेंद्र फडणवीस २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी मुख्यमंत्री होते. तेव्हा आदित्यने विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला होता. फडणवीस मला म्हणाले की, आदित्यला मी चांगला तयार करतो. अडीच वर्षानंतर त्याला आपण मुख्यमंत्री करू. मी त्यावेळीच त्यांचा विरोध केला. आदित्य लहान आहे, त्याच्या डोक्यात हे घालू नका, असे सांगितले. पण आदित्यला जर मुख्यमंत्री केले, तर तुम्ही इतके ज्येष्ठ नेते त्याच्या हाताखाली काम कसे करणार ? असा प्रश्न मी विचारला. त्यावर फडणवीस म्हणाले की, अडीच वर्षानंतर मी दिल्लीत जाणार. मला अर्थखात्यातले जरा कळते. “याचा अर्थ देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात जाऊन अर्थमंत्री बनण्यात रस होता”, असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला.
देवेंद्र फडणवीसांचे चोख प्रत्युत्तर
मात्र उद्धव ठाकरेंचा हा दावा देवेंद्र फडणवीसांवनी फेटाळून लावत त्यांना चोख प्रत्युत्तर दिले. आमचे जुने मित्र उद्धव ठाकरे थोडे भ्रमिष्ट झाले आहेत, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. आज ते म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी मला सांगितलं होतं की मी आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करेन आणि मी दिल्लीला जाईल. त्यांना वेड लागलं असेल मला तर नाही ना… असा माझा सवाल आहे.
अमित शाहांनी त्यांना कोणत्या तरी खोलीत नेऊन तुम्हाला मुख्यमंत्री करतो असं सांगितलं. हा त्यांचा कालपर्यंतचा भ्रम होता. आता त्यांचा भ्रम बदलला. आता म्हणतात, देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की आदित्यला मुख्यमंत्री करतो. सध्या या मुद्यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.