केंद्राकडील GST ची थकबाकी न मिळाल्याने विकासाची गती मंदावली, धनंजय मुंडेंचा मोदी सरकारवर हल्लाबोल
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी कोरोना आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर केंद्राने महाराष्ट्राची जीएसटी थकबाकी न दिल्याच्या मुद्द्यावर मोदी सरकारवर हल्लाबोल केलाय.
अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी कोरोना आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर केंद्राने महाराष्ट्राची जीएसटी थकबाकी न दिल्याच्या मुद्द्यावर मोदी सरकारवर हल्लाबोल केलाय. ते अहमदनगरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. तसेच यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांसह भाजप आणि केंद्र सरकारवर सडकून टीका केली. महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर भाजपने राज्य सरकारवर जोरदार टीका केली. यालाही धनंजय मुंडे यांनी प्रत्युत्तर दिलंय (Dhananjay Munde criticize Modi Government and Devendra Fadnavis).
धनंजय मुंडे म्हणाले, “महाविकास आघाडीला सत्तेत येऊन 1 वर्ष पूर्ण झालं आहे. या काळात कोरोनाचं मोठं संकट आलं. या संकटात जनतेच्या आरोग्याचा सांभाळ करत आणि विकासाची सांगड घालत 1 वर्ष गेलं. दुसरीकडे सरकारने 2 लाखांपर्यंत कर्जमाफीचा आणि नियमित कर्ज फेडणाऱ्या कर्जदारांना 50 हजार रुपये आर्थिक सहाय्य देण्यासारखे अनेक महत्वाचे निर्णय घेतले. मात्र, सध्या केंद्राकडे राहिलेले GST चे पैसे न मिळाल्याने राज्यावर अनेक आर्थिक निर्बंध लागले आहेत. मोदी सरकारने महाराष्ट्राची हक्काचे जीएसटी थकबाकी न दिल्याने सध्या राज्यातील विकासाची गती मंदावली आहे,” असा आरोप धनंजय मुंडे यांनी केला.”
तुम्ही मुख्यमंत्री असताना अनेकांना कशाप्रकारे धमक्या दिल्या याच्या ऑडिओ, व्हिडीओ क्लिप सर्वांनीच पाहिल्या आहे. त्या पुन्हा पुन्हा काढायला लावू नका, असा इशाराही धनंजय मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिलाय.
‘काहीही करुन एखाद्या व्यक्तीची बदनामी करण्याची भाजपची जुनी पद्धत’
धनंजय मुंडे म्हणाले, “ज्या संस्कारांमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लहानचे मोठे झाले त्यात हे धमकावणे वगैरे त्यांना कधीच जमलं नाही. तसं आम्ही देखील कधी पाहिलं नाही. एखादा व्यक्ती कुठल्या अर्थाने बदनाम होत नाही, मग त्या व्यक्तीला वेगळ्या पद्धतीने बदनाम करायचं ही भारतीय जनता पार्टीची जुनी पद्धत आहे. विरोधी पक्षनेते मुख्यमंत्र्यांवर धमकावण्याचा आरोप करत आहेत. पण विरोधी पक्षनेते स्वतः मुख्यमंत्री असताना अनेकांना कशाप्रकारे धमक्या दिल्या याच्या ऑडिओ, व्हिडीओ क्लिप सर्वांनीच पहिल्या आहे. त्या पुन्हा पुन्हा काढायला लावू नका.”
“तसेच विरोध करणंच विरोधी पक्षाचे कामच आहे, विरोधी पक्ष आम्ही चांगले केलेल्या कामाला चांगलं कधी म्हणणारच नाही, तर विरोधीपक्ष आमच्यावर कायम टीका करणार आहेय, अस मुंडे म्हणालेय. महाविकासआघाडी ज्यादिवसापासून स्थापन झाली, त्या दिवसापासून विरोधीपक्ष टीका करतो, नाही तर मृदू बनतो असा टोला त्यांनी लगावलाय.
“अभूतपूर्व लोकप्रियता असलेला लोकनेता गमावला”
धनंजय मुंडे म्हणाले, ” स्वर्गीय आमदार भारत भालके यांना श्रद्धांजली अर्पण करतो. अभूतपूर्व लोकप्रियता असलेला लोकनेता गमावला याचे दुःख आहेय, तर त्यांची पोकळी भरून निघणं अशक्य आहे. त्यांच्या जाण्याने पक्षाचे नुकसान तर झालेच पण वैयक्तिक पण नुकसान झालेय. खऱ्या अर्थाने पांडुरंगाचा भक्त सगळ्यांनी गमावला अशा शब्दात मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
संबंधित बातम्या :
भाजपला मराठवाड्याच्या मातीत असं गाडा की ते निवडणूकच विसरले पाहिजे; धनंजय मुंडेंचा घणाघात
महापरिनिर्वाण दिनाचं थेट प्रक्षेपण करु, पण अनुयायांना चैत्यभूमीवर प्रवेश नाही : धनंजय मुंडे
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच, सरकारकडून मदतीच्या आश्वासनाची पूर्तता अद्याप नाही!
Dhananjay Munde criticize Modi Government and Devendra Fadnavis