Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धनंजय मुंडेंना Bell’s palsy दुर्मिळ आजाराचे निदान, सलग दोन मिनिटही बोलता येत नसल्याची माहिती

धनंजय मुंडेंना बेल्स पाल्सी नावाचा आजार झाला आहे. या आजाराच्या रुग्णांना दोन मिनिटंही बोलता येत नाही, अशी माहिती धनंजय मुंडेंनी दिली आहे.

धनंजय मुंडेंना Bell's palsy दुर्मिळ आजाराचे निदान, सलग दोन मिनिटही बोलता येत नसल्याची माहिती
Follow us
| Updated on: Feb 20, 2025 | 4:59 PM

अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांची प्रकृती बिघडली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या दोन्ही डोळ्यांची शस्त्रक्रिया करण्यात आली. यानंतर आता धनंजय मुंडेंना बेल्स पाल्सी नावाचा दुर्मिळ आजार झाला आहे. यामुळे त्यांच्यावर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरु आहे. या आजारामुळे त्यांना सलग दोन मिनिटेही व्यवस्थित बोलता येत नाही. त्यामुळे त्यांनी कॅबिनेट आणि जनता दरबार कार्यक्रमला अनुपस्थित राहिल्याचे सांगितले आहे.

धनंजय मुंडे यांनी त्यांच्या अधिकृत ट्वीटरवरुन एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी त्यांना बेल्स पाल्सी नावाचा आजार झाल्याची माहिती दिली आहे. तसेच ते पुन्हा कधी रुजू होणार याबद्दलही सांगितले आहे.

धनंजय मुंडे काय म्हणाले?

“माझ्या दोन्ही डोळ्यांवर पंधरा दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. पद्मश्री डॉ. टी.पी. लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली या शस्त्रक्रिया पार पडल्या. साधारण दहा दिवस त्यांनी डोळ्यांची काळजी विशेषत: तीव्र प्रकाश, धूळ आणि उन्हा पासून काळजी घेण्याचा सल्ला दिला होता. त्याच दरम्यान मला Bell’s palsy नावाच्या आजाराचे निदान झाले. त्याच्यावरील उपचाराचे निदान सध्या रिलायन्स हॉस्पिटल मधील प्रसिद्ध डॉ. अरुण शहा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या आजारामुळे सध्या मला सलग दोन मिनिटही व्यवस्थित बोलता येत नाही”, असे धनंजय मुंडे म्हणाले.

“त्यामुळे सध्या एक-दोन कॅबिनेट आणि पक्षाच्या जनता दरबार कार्यक्रमाला मला उपस्थित राहता आले नाही. याबाबत मी मुख्यमंत्री आदरणीय श्री.देवेंद्र फडणवीस साहेब तसेच आमच्या पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री आदरणीय श्री. अजितदादा पवार यांना कल्पना दिलेली आहे. लवकरच या आजारावर मात करून मी पुन्हा जनसेवेच्या कामात रुजु होईल…”, अशी माहिती धनंजय मुंडे यांनी ट्वीट करत दिली आहे.

बेल्स पाल्सी आजार नेमका काय?

बेल्स पाल्सी हा आजार झालेल्या व्यक्तीच्या चेहऱ्याचे स्नायू कमकुवत होतात. यामुळे चेहऱ्याच्या एका बाजूला अचानक अशक्तपणा येतो. काहीवेळा अर्धांगवायू देखील होऊ शकतो. यामुळे तुम्हाला एक डोळा बंद करण्यात अडचणी येऊ शकतात. तसेच हसण्यासही त्रास होऊ शकतो. हा आजार झालेल्या व्यक्ती पूर्णपणे ठीक होण्यासाठी साधारण काही आठवड्यांचा कालावधी लागतो.

कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा.
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं.
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली.
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल.
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना.
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.