धनंजय मुंडे म्हणतात कोण निलेश राणे? पवारांवरील आरोपानंतर राष्ट्रवादी आक्रमक
ईडीनं अटक केल्यानंतरही महाविकास आघाडी सरकारनं नवाब मलिक (Nawab Malik) यांचा राजीनामा घेतलेला नाही. त्यावर निलेश राणे यांना प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यावर बोलताना निलेश राणेंनी हे विधान केलंय. त्याला आता धनंजय मुंडेंनी त्याच शब्दात उत्तर दिले आहे.
मुंबई : नवाब मलिकांच्या अटकेवरून मुंबई ते दिल्ली पॉलिटिकल हंगामा सुरू आहे. त्यातच आता निलेश राणे (Nilesh Rane) यांनी पवारांवर (Sharad Pawar) आरोप कत एक ट्विट केलं, ज्याने आता राज्याच्या राजकारणात ठिणग्या पडल्या आहेत. पत्रकार परिषदेत बोलत असताना निलेश राणे यांनी शरद पवार दादऊचा माणूस आहेत की काय, अशी शंका उपस्थित केली आहे. ईडीनं अटक केल्यानंतरही महाविकास आघाडी सरकारनं नवाब मलिक (Nawab Malik) यांचा राजीनामा घेतलेला नाही. त्यावर निलेश राणे यांना प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यावर बोलताना निलेश राणेंनी हे विधान केलंय. त्याला आता धनंजय मुंडेंनी त्याच शब्दात उत्तर दिले आहे. निलेश राणे यांनी केलेल्या टीकेबद्दल धनंजय मुंडे यांना विचारले असाता, कोण निलेश राणे? असा मिश्कील सवाल धनंजय मुंडेंनी केलाय.
पंकजा मुंडेंनी बीडची बदनामी केली
दरम्यान धनंजय मुंडे यांनी फक्त निलेश राणे यांचाच समाचर नाही घेतला, तर त्यांनी पंकजा मुंडे यांनाही टार्गेट केलं आहे. ज्याला कुणाला एखादा विषय मांडायचा असतो त्यांनी मांडावा. मात्र बीड जिल्हा असा बीड जिल्हा तसा असे चालू आहे. असे बोलून तुम्ही बीड जिल्ह्याला बदनाम करू नका. असा टोला त्यांनी लगावला आहे. समजा मी धनंजय मुंडे म्हणून काम करत नसेल तर धनंजय मुंडेंला वाट्टेल तसं बदनाम करा. मात्र बीड जिल्ह्याला बदनाम करू नका. बीड जिल्हा बिहार झालाय, बीड जिल्ह्याला मागास म्हणून माझ्या जिल्ह्याची बदनामी करू नका. अशी परखड टीका मंत्री धनंजय मुंडे यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यावर केली आहे.
मलिकांच्या अटकेने आयते कोलीत
सर्वात आधी भारतीय जनता पार्टीने बीड जिल्ह्याची बदनामी केली. माजी पालकामंत्र्यांनी ज्या पद्धतीने पत्र लिहिले खऱ्या अर्थाने बीड जिल्हा इथेच बदनाम झाला. असेही धनंजय मुंडे म्हणाले आहेत. याचवेळी त्यांना निलेश राणे यांच्या टीकेबाबत पत्रकारांनी विचारण केली असता धनंजय मुंडेंनी हे उत्तर दिलंय. गेल्या अनेक दिवसांपासून मुद्दा कोणताही असला तरी राणे कुटुंबियांचं टार्गेट महालिकास आघाडी आहे. कधी शिवसेना, तर राष्ट्रवादी, आता नवबा मलिक यांच्या अटकेने राणेंच्या हातात आयते कोलीत मिळाले आहे.
कोण आहे तेजस मोरे, ज्याच्यावर आहे प्रवीण चव्हाणांचं स्टिंग करून फडणवीसांना दारुगोळा पुरवल्याचा आरोप!
Video – Nagpur | प्रभाग रचनेची काम पुन्हा राज्याकडे येणार? विजय वडेट्टीवार यांनी नेमकं काय सांगितलं