मोठी बातमी! धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढणार? तो Video समोर, एका हातात पिस्तूल तर गाडीत…
मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणीत आता आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुंडेंचा एका फोटो ट्विट केला आहे.
मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत आता आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांचे दोन व्हिडीओ ट्विट केले आहेत. या व्हिडीओमुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढू शकतात. अंजली दमानिया यांनी मुंडेंचा एक व्हिडीओ जो ट्विट केला आहे, त्यामध्ये मुंंडेंच्या हातात पिस्तूल दिसत आहे. ‘हे असले बॉस ? इनेटाग्राम वर अशी reels दाखवल्यावर नवी पिढी ह्यातून काय प्रेरणा घेणार ? कष्ट न करता पिस्तुल दाखवून पैसे कमावणे सोपे असेच त्यांना वाटते. आपला देश असा असणार आहे का ? हे देशाबद्दल vision असणार आहे का ? ताबडतोब बीड मधील सगळ्या शास्त्र परवान्यांवर चौकशी लावा. गरज नसलेले सगळे परवाने रद्द करा’ असं कॅप्शन देखील दमानिया यांनी या व्हिडीओ दिलं आहे.
दोन व्हिडीओ ट्विट
दरम्यान दमानिया यांनी धनंजय मुंडे यांचे दोन व्हिडीओ ट्विट केले आहेत. पहिल्या व्हिडीओमध्ये धनंजय मुंडे हे गाडी चालवताना दिसत आहेत, तर त्यांच्या शाजारी वाल्मिक कराड बसलेले दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती, या प्रकरणात वाल्मिक कराड यांच्यावर देखील आरोप करण्यात येत आहे. दरम्यान वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे हे एकाच कारमध्ये बसल्याचा आणि मुंडे गाडी चालवत असल्याचा व्हिडीओ दमानिया यांनी ट्विट केला आहे. तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये धनंजय मुंडे यांच्या हातात पिस्तूल दिसत आहे. हे दोन व्हिडीओ ट्विट करून ‘हे असले बॉस ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
हे असले बॉस ?
इनेटाग्राम वर अशी reels दाखवल्यावर नवी पिढी ह्यातून काय प्रेरणा घेणार ?
कष्ट न करता पिस्तुल दाखवून पैसे कमावणे सोपे असेच त्यांना वाटते.
आपला देश असा असणार आहे का ? हे देशाबद्दल vision असणार आहे का ?
ताबडतोब बीड मधील सगळ्या शास्त्र परवान्यांवर चौकशी लावा. गरज… pic.twitter.com/bQGa71D79D
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) December 26, 2024
दरम्यान अंजली दमानिया यांनी हे ट्विट करतानाच ‘ताबडतोब बीड मधील सगळ्या शास्त्र परवान्यांवर चौकशी लावा. गरज नसलेले सगळे परवाने रद्द करा’ अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.