माझ्यावर वार केला, शरद पवारांचं राजकारण संपलं; अजित पवार गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Dharamrao Baba Atram on Sharad Pawar : शरद पवार यांच्यावर अजित पवार गटातील नेत्याने शाब्दिक हल्ला चढवला आहे. शरद पवार यांचं राजकारण संपलं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. शिवाय विधानसभा निवडणुकीतील विजयावरही त्यांनी भाष्य केलं आहे. वाचा सविस्तर बातमी...
विधानसभा निवडणुकीच्या आधी गडचिरोली जिल्ह्यातील राजकीय समीकरणं बदलली. गडचिरोलीतील अहेरीमध्ये मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या विरोधात त्यांचीच लेक भाग्यश्री आत्राम यांना शरद पवारांनी काही उमेदवारी दिली. मात्र तिथे धर्मराव बाबा आत्राम यांचा 16 हजार 814 मतांनी विजय झाला आहे. भाग्यश्री आत्राम यांना 35 हजार 765 मतं मिळाली आहेत. या निकालावर प्रतिक्रिया देताना अजित पवार गटाचे नेते धर्मराव बाबा आत्राम यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे. शरद पवारांचं राजकारण संपल्याचं धर्मराव बाबा आत्राम म्हणालेत.
शरद पवार यांच्यावर निशाणा
शरद पवार यांनी आमच्या घरावर वार केला. लोकांनी त्यांच्या घरावर वार केला. त्यांचं राजकारण संपलं आहे. त्यांची काम करण्याची पद्धत आणि त्यांचं राजकारण संपलं. ते आता आमच्याकडे येतील, असं विधान धर्मराव बाबा आत्राम म्हणाले आहे.
अहेरीतील विजयावर आत्राम काय म्हणाले?
अहेरी मतदारसंघात झालेल्या विजयावर आत्राम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझा विजय होणारच होता. ते मी आधीच सांगितलं होतं. चौथ्या नंबरवर माझी मुलगी येईल असं मी सांगितलं होतं पण तिसऱ्यावर आली. मी आधीच सांगितलं होतं 200 च्या वर आमच्या महायुतीच्या जागा येतील आणि तसंच झालं आमचं उद्या परवा सरकार स्थापन होईल. त्यांच्या पक्षाच ते पाहतील ते लढाई झाली आता आम्हाला ४१ जागा मिळाल्या या चांगल्या आहे. आम्ही अपेक्षा केली नव्हती त्यापेक्षा जास्त जागा मिळाल्या, असं धर्मरावबाबा आत्राम म्हणालेत.
सरकारन जाहीर केलेल्या योजनांचा चांगला फायदा झाला लाडका भाऊ लाडकी बहीण या सगळ्या योजनांचा चांगला फायदा झाला. लोकांनी आम्हाला निवडून दिलं. आता विरोधकांनी पाच वर्षे विरोधी बाकावर बसायचं ते आता बसतील. त्यांचं काम ते करतील आमचं काम आम्ही करू सगळे मोठे मोठे नेते पडले. त्यांचा झालं आता ते कुठेतरी थांबले पाहिजे.आमचे नेते पडतील असं ते बोलत होते मात्र ते निवडून आले, असं आत्राम यांनी म्हटलं आहे.