…म्हणून देवेंद्र फडणवीस यांना तुळजाभवानीचा कोप लागल्याशिवाय राहणार नाही; ठाकरे गटाच्या नेत्याची फडणवीस यांच्यावर सडकून टीका

बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्व व मराठी माणसासाठी ज्या तुळजाभवानीच्या आशिर्वादाने शिवसेना उभी केली होती. ती शिवसेना देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांनी फोडून राज्यात घाणरडे राजकारण करण्याचा प्रयत्न केलाआहे.

...म्हणून देवेंद्र फडणवीस यांना तुळजाभवानीचा कोप लागल्याशिवाय राहणार नाही; ठाकरे गटाच्या नेत्याची फडणवीस यांच्यावर सडकून टीका
Follow us
| Updated on: Mar 21, 2023 | 4:04 PM

धाराशिव : हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्व व मराठी माणसासाठी ज्या तुळजाभवानीच्या आशीर्वादाने शिवसेना उभी केली होती. ती शिवसेना देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांनी फोडून घाणेरडे राजकारण केल आहे. त्यामुळे त्यांना आई तुळजाभवानीचा कोप लागल्याशिवाय राहणार नसल्याचे वक्तव्य चंद्रकांत खैरे यांनी केले आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकारला एकनाथ शिंदे यांनी बंड करून पायउतार केले होते. त्या दिवसांपासून एकनाथ शिंदे गट आणि ठाकरे गट असे दोन गट निर्माण झाले. या दोन्ही गटांकडून एकमेकांवर जोरदारपणे आरोप-प्रत्यारोप करण्यात आले आहेत.

शिवसेनेचे 40 आमदार आणि 13 खासदार शिंदे गटात सामील झाल्याने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले होते. त्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला होता.

उद्धव ठाकरे यांना पायउतार व्हावे लागल्यामुळे ठाकरे गट पूर्वीपासूनच शिंदे गटावर आक्रमकपणे टीका करत आहेत. त्याच बरोबर ज्या प्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ज्या प्रमाणे टीका केली जात आहे. त्याच प्रमाणे ठाकरे गटाकडून देवेंद्र फडणवीस यांच्यावरही प्रचंड टीका केली जात आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच शिवसेना फोडण्याचे काम केले असल्याची टीका आज ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनीच शिवसेना फोडण्याचं नीच काम केले असल्याचा घणाघात त्यांनी त्यांच्यावर केला आहे. माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी धाराशिवमध्ये तुळजाभवानीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी ही जहरी टीका केली आहे.

बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्व व मराठी माणसासाठी ज्या तुळजाभवानीच्या आशिर्वादाने शिवसेना उभी केली होती. ती शिवसेना देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांनी फोडून राज्यात घाणरडे राजकारण करण्याचा प्रयत्न केलाआहे.

त्यामुळे त्यांना आई तुळजाभवानीचा कोप लागल्याशिवाय राहणार नसल्याचे वक्तव्य चंद्रकांत खैरे यांनी केले आहे. संभाजीनगरला महाविकास आघाडीची होणाऱ्या सभेच्या नियोजनासाठी चंद्रकांत खैरे यांनी तुळजाभवानीचे दर्शन घेण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी हा घणाघात केला आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.