कॅबिनेट मंत्र्याची लेक शरद पवार गटात प्रवेश करणार; अजितदादांचा कडक शब्दात इशारा

Bhagyashree Atram Halgekar will enter in NCP Sharad Pawar : कॅबिनेट मंत्र्याची लेक शरद पवार गटात प्रवेश करणार आहे. त्यामुळे गडचिरोलीच्या राजकीय वर्तुळात मोठा बदल होणार आहे. याचवेळी अजित पवार यांनी मात्र कडक शब्दात इशारा दिला आहे. वाचा सविस्तर बातमी...

कॅबिनेट मंत्र्याची लेक शरद पवार गटात प्रवेश करणार; अजितदादांचा कडक शब्दात इशारा
शरद पवार, अजित पवारImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Sep 07, 2024 | 10:16 AM

विधानसभा निवडणुकीआधी राज्याच्या राजकीय वर्तुळात उलाथापालथ व्हायला सुरुवात झाली. आहे. कोल्हापुरात समरजित घाटगे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला. त्यानंतर आता आणखी एक मोठा प्रवेश शरद पवार गटात लवकरच होणार आहे. गडचिरोली अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. कारण कॅबिनेट मंत्री धर्मराव आत्राम यांची कन्या भाग्यश्री आत्राम- हलगेकर शरद पवार राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे गडचिरोलीतील अहेरी विधानसभा मतदारसंघात बाप विरूद्ध लेक संघर्ष रंगणार आहे.

कधी होणार पक्षप्रवेश?

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे लवकरच गडचिरोली दौऱ्यावर जाणार आहेत. येत्या 11 किंवा 12 तारखेला जयंत पाटील आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे गडचिरोलीचा दौरा करतील. त्यांच्या या गडचिरोली दौऱ्यात दोन बडे नेते प्रवेश करणार आहेत. धर्माराव बाबा आत्राम यांची कन्या भाग्यश्री आत्राम- हलगेकर आणि त्याचे पती ऋतुराज हलगेकर हे दोघेही शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. मोठ्या प्रमाणाकडून कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना जमण्याचा प्रयत्न सध्या भाग्यश्री आत्राम- हलगेकर यांच्याकडून सुरू आहे. विधानसभा निवडणूक जवळ असून गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा मतदारसंघात राजकारण सध्या तापलं आहे.

अजित पवार काय म्हणाले?

बाबाच्या मुलीने दुसऱ्या पक्षात जाण्याचा ठरविलं, असं बाबाने सांगितलं. ती आता बाबा च्या विरोधात उभी राहील म्हणते हे शोभते का? तुम्ही आशा गोष्टीत लक्ष देऊ नका. वस्ताद सगळे डाव शिकवतो पण एक डाव स्वतःसाठी राखून ठेवतो. तो डाव दाखविण्याची वेळ येऊ नये. म्हणून तुम्ही बाबा च्या मागे उभे राहा त्यांना निवडून आणा, असं अजित पवार म्हणाले.

धर्माराव आत्राम यांची प्रतिक्रिया

धर्मराव बाबा आत्राम यांनी स्वत: लेकीवरच जोरदार हल्लाबोल केला आहे. शरद पवार गटातील काही लोक माझं घर फोडायचा काम सुरू आहे. माझ्या मुलीला ते आपल्या पक्षात घेणार आहे. तिच्यावर विश्वास ठेवू नका. जी मुलगी माझी होऊ शकली नाही ती इतरांनाही काय होणार? यांना आपण प्राणहिता नदीत वाहून देऊ. तिला माझ्या विरोधात उभं करण्याची तयारी त्यांनी सुरू केली. माझ्या खुर्चीवर कोणी बसण्याचा प्रयत्न करणार असेल. तर मी त्यांची वाट लावणार आहे. एक मुलगी गेली तर चालेल, माझ्या मागे घरातील सगळी फौज तयार आहे, असं धर्माराव बाबा आत्राम म्हणाले.

'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल.
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?.
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका.
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?.
पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक चर्चेत जागावाटपावर शिंदेंचं मोठं वक्तव्य
पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक चर्चेत जागावाटपावर शिंदेंचं मोठं वक्तव्य.
जुन्या आणि नव्या पेन्शन योजनेत फरक आहे तरी काय? तुम्हाला माहितीये?
जुन्या आणि नव्या पेन्शन योजनेत फरक आहे तरी काय? तुम्हाला माहितीये?.
गडकरींचा गौप्यस्फोट, कोणाकडून PM पदाची ऑफर? प्रस्तावावर काय म्हणाले?
गडकरींचा गौप्यस्फोट, कोणाकडून PM पदाची ऑफर? प्रस्तावावर काय म्हणाले?.
लाडकी बहीणच्या श्रेयवादावरुन ठाकरे-पवारांनी घेरलं, ‘1500 नको, आधी...’
लाडकी बहीणच्या श्रेयवादावरुन ठाकरे-पवारांनी घेरलं, ‘1500 नको, आधी...’.
पोलिसांकडून बाप्पालाच अटक? कर्नाटकात काय घडलं? वादाचं कारण तरी काय?
पोलिसांकडून बाप्पालाच अटक? कर्नाटकात काय घडलं? वादाचं कारण तरी काय?.
या 40 गद्दारांचा सूड आपल्याला घ्यायचा आहे, संजय राऊत यांचे आव्हान
या 40 गद्दारांचा सूड आपल्याला घ्यायचा आहे, संजय राऊत यांचे आव्हान.