धुळ्यात मनसे विद्यार्थ्यी सेना अध्यक्षावर आत्मदहनाची वेळ, वृक्षतोडविरोधी आवाज कोण दाबतंय?
मनसेचे विद्यार्थ्यी सेना शहर अध्यक्ष हर्षल परदेशी यांनी पालिकेसमोर आत्मदहनचा प्रयत्न केला.

धुळे : धुळे शहरातील गल्ली नंबर 5 येथे करण्यात आलेल्या अवैध वृक्षतोडच्या निषेधार्थ (Harshal Pardeshi Tried To Self-Immolation) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने हर्षल परदेशी यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी वेळीच रोखल्याने पुढील अनर्थ टळला. मनसेचे विद्यार्थ्यी सेना शहर अध्यक्ष हर्षल परदेशी यांनी पालिकेसमोर आत्मदहनचा प्रयत्न केला. शहरातील ठेकेदारने जुनी झाडे तोडल्याप्रकरणी पालिकेकडून समाधान कारक उत्तर न मिळाल्याने परदेशीने अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनचा प्रयत्न केला. यानंतर पोलिसांनी त्यांनी ताब्यात घेतलं (Harshal Pardeshi Tried To Self-Immolation).
“धुळे शहरातील गल्ली नंबर 5 येथील बँकेसमोर असलेले लिंबाचे झाड कोणतीही कायदेशीर परवानगी न घेता 15 डिसेंबर 2020 रोजी तोडण्यात आले आहे. तसेच, या वृक्षाची दिवसाढवळ्या वाहतूक करण्यात आली. महाराष्ट्र झाडांचे संरक्षण आणि जतन अधिनियम 1975 च्या अधिनियमान्वये वृक्षतोड करण्यासाठी नियमानुसार वृक्ष प्राधिकरण समितीची परवानगी घेऊन अनामत रक्कम भरुनच सबळ कारणे असल्यास आणि कोणते हरकती असल्यास वृक्षतोड करता येते. तसेच, त्या बदल्यात झाडे लावणे अनिवार्य असते, असे असतानादेखील गल्ली नंबर 5 या ठिकाणी तोडण्यात आलेल्या वृक्षाबाबत महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समिती मला कुठलीही माहिती नसल्याचे समोर आले आहे. ही वृक्षतोड करणाऱ्या ठेकेदारावर आणि मनपा अधिकाऱ्यांवर कार्यवाही करावी”, अशी मागणी मनसेच्या वतीने शहराध्यक्ष हर्षल परदेशी यांनी केली होती.
मात्र, अद्याप त्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने हर्षल परदेशी यांनी आयुक्तांच्या दालनासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर आज (20 डिसेंबर) हर्षल परदेशी हे आत्मदहन करण्यासाठी महापालिकेत आले असता पोलिसांनी त्यांना वेळीच रोखले. यामुळे पुढील अनर्थ टळला. यावेळी महापालिका आवारात पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. त्यानंतर पोलिसांनी हर्षल परदेशी यांना ताब्यात घेतले. यावेळी त्यांनी महापालिकेविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली.
“105 आमदार कामी आले नाहीत, पूर्वाश्रमीच्या काँग्रेस नेत्यामुळे भाजपला एक जागा” https://t.co/OScZrtHNS3 #Dhule #AmrishPatel #Congress #BJP #DhuleNandurbar #VidhanParishad #SachinSawant @sachin_inc
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 4, 2020
Harshal Pardeshi Tried To Self-Immolation
संबंधित बातम्या :
PHOTO | आश्चर्य! धुळ्यात गायीने दिला चार वासरांना जन्म; दुर्मिळ घटनेमुळे बघ्यांची गर्दी
Gram Panchayat Election: मनसेचं मिशन ग्रामपंचायत, राज ठाकरेंच्या निर्णयाचा फटका कुणाला?