Dhule Boy Drown : मित्रांसोबत नदीवर पोहायला गेला तो परतलाच नाही, मग दुसऱ्या दिवशी थेट…

पाचवीत शिकणारा मुलगा मित्रांसोबत नदीवर पोहायला जातो सांगून दुपारी घरुन गेला. मात्र तो पुन्हा परतलाच नाही. दुसऱ्या दिवशी समोरचं दृश्य पाहून कुटुंबीयांना धक्काच बसला.

Dhule Boy Drown : मित्रांसोबत नदीवर पोहायला गेला तो परतलाच नाही, मग दुसऱ्या दिवशी थेट...
नदीवर अंघोळीसाठी गेलेला मुलगा बुडालाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jul 18, 2023 | 2:35 PM

धुळे / 18 जुलै 2023 : सध्या पावसाळा सुरु असल्याने नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. यामुळे वारंवार प्रशासनाकडून नदी, समुद्र, धबधबे आदि ठिकाणी न जाण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. मात्र ग्रामीण भागात या सूचनांकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसत आहेत. गावातील शाळकरी मुलं, तरुण सर्रास नदीवर अंघोळीची मजा घेताना दिसतात. मात्र हीच मजा जीवावर बेतत असल्याच्या अनेक घटना उघडकीस येत आहेत. अशीच एक घटना धुळ्यात उघडकीस आली आहे. मित्रांसोबत अरुणावती नदीवर अंघोळीसाठी गेलेल्या 13 वर्षाच्या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मित्रांसोबत नदीवर अंघोळ करणे जीवावर बेतले

शिरपूर शहराजवळील मांडळ शिवारात आज सकाळी मुलाचा मृतदेह आढळून आला. पीडित कुटुंब मूळचे सावळदे गावचे रहिवासी आहेत. मयत मुलाचे वडील शिरपूर आगारात चालक म्हणून कार्यरत असल्याने ते सध्या शिरपूरमध्ये राहतात. मयत मुलगा पाचवी इयत्तेत शिकत होता. सोमवारी दुपारी एक वाजता मुलगा मित्रांसोबत नदीवर पोहण्यासाठी म्हणून घरुन निघून गेला.

मात्र संध्याकाळ झाली तरी मुलगा घरी परतलाच नाही. घरच्यांनी सर्वत्र शोध सुरु केला. मात्र मुलगा कुठेच सापडला नाही. यानंतर आज सकाळी थेट त्याचा मृतदेह मांडळ शिवारात आढळला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. मुलाच्या दुर्दैवी मृत्यूमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

हे सुद्धा वाचा

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.