योजनेचे पैसे मिळाले नाही, मी सावत्र बहीण आहे का ? लाडकी बहीण कार्यक्रमात महिलेचा थेट सवाल
धुळ्यातही नुकताच लाडकी बहीण योजनेसंदर्भात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र तेव्हा तेथे आलेल्या एका महिलेने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. ' मला योजनेचे पैसे मिळाले नाहीत मी सावत्र बहीण आहे का ?' असा सवाल त्या महिलेने थेट व्यासपीठावरून केला.
महायुती सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा सध्या सगळीकडे बोलबाल आहे. योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या 21 ते 65 वयोगटातील महिलांना महिना 1500 रुपये देण्याची घोषणा सरकारने केली असून आत्तापर्यंत राज्यातील महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. धुळ्यातही नुकताच लाडकी बहीण योजनेसंदर्भात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र तेव्हा तेथे आलेल्या एका महिलेने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. ‘ मला योजनेचे पैसे मिळाले नाहीत मी सावत्र बहीण आहे का ?’ असा सवाल त्या महिलेने थेट व्यासपीठावरून केला. तिच्या या विधानाची सध्या सर्वत्र चर्चा असून बरेच पडसाद उमटताना दिसत आहेत. उर्वरित महिलांनाही या योजनेचा लाभ द्यावा अशी मागणीदेखील त्या महिलेने केली.
धुळ्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम सुरू होता. त्यावेळी मंचावर मंचावरील जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा परिषद अध्यक्ष आणि आमदार उपस्थित होते. तेव्हा प्रातिनिधिक स्वरूपामध्ये महिला बचत गटाच्या तीन ते चार महिलांना बोलण्याची संधी देण्यात आली होती त्यापैकी एक महिला आली आणि तिने बोलायला सुरूवाता करताच सर्वांच्या भुवया उंचावल्या. त्यावेळी या महिलेने सर्वांसमोर थेट भाष्य करत प्रश्न विचारत सर्वांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. ‘ आपल्या ज्या लाडक्या बहिणी आहेत, तर मी काही बहीण नाही, मी सावत्र बहीण आहे. कारण मला काही ती योजना, त्याचा लाभ मिळालेला नाही. माझ्यासारख्या अशा अजून 30 टक्के महिला आहेत, ज्यांना अजूनही या योजनेचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे मला जिल्हाधिकाऱ्यांना सांगायचं आहे की ज्या महिला राहिल्या आहेत, त्यांचंही काम करा ‘ अशी मागणीदेखील त्या महिलेने केली.
आता तिच्या मागणीनंतर काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.