काँग्रेसवाले म्हणतात आम्ही मतांचा जिहाद करणार, पण त्यांना…; देवेंद्र फडणवीस यांचा निशाणा
Devendra Fadnavis on Cogress Loksabha Election 2024 : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर निशाणा...; म्हणाले, काँग्रेसवाले म्हणतात आम्ही मतांचा जिहाद करणार, पण त्यांना... धुळ्यात बोलताना देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर....
धुळ्यात आज महायुतीची सभा झाली. या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबोधित केलं. काश्मीरमधून 370 कलम रद्द केले त्या अमित शाहांचं स्वागत… ही निवडणूक सादर निवडणूक नाही देशाचा नेता निवडायचा आहे. लोकसभेत आपण ज्यांना निवडून पाठवतो ते देशाचा नेता निवडता. जो आपला देश सुरक्षित राहील याचा विचार करतो. जो आपल्या अशा तुमच्या पूर्ण करू शकतो. याला आपल्याला निवडायचं आहे. एकीकडे पांडवांचे नेकीकडे कौरवांची सेना आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
काँग्रेसवर टीकास्त्र
सर्वाधिक उद्योग जर त्या ठिकाणी येणार असतील त्याचं नाव आहे धुळे…या धुळ्यात सहा महामार्ग आहेत. रेल्वेच्या कनेक्टीमुळे धुळ्याला वेगळं महत्त्व प्राप्त झाला आहे. हे मोदींमुळे शक्य झाला आहे. काँग्रेसचे लोक म्हणतात आम्ही मतांचा जिहाद करणार आहोत. तर त्यांना सांगा आम्ही मतांचा यज्ञ करणार आहोत, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर टीकास्त्र डागलं आहे.
येणारा वीस तारखेला याचा निर्णय घ्यायचा आहे. एकीकडे विश्व गौरव असलेले विकास पुरुष नरेंद्र पुरुष आहेत. एकीकडे राहुल गांधी आहे राहुल गांधी सोबत 30 40 पक्ष एकत्र आले आहेत. त्यांना आम्ही एकच प्रश्न विचारला आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. तुमचे पंतप्रधान कोण आहेत. त्यांनी अद्यापही उत्तर दिलेले नाही. गोष्टीवर येणारा पोपटलाल आम्ही पाच वर्षात पाच पंतप्रधान करू, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊतांवर टीका केली आहे.
भामरेंच्या कामाचं कौतुक
हा देशाच्या भाग्याचा निर्णय आहे. ज्या मोदीजींनी देशाचा परिवर्तन केलं. सर्वसामान्यांच्या जीवनात परिवर्तन केलं. त्या मोदींना निवडून द्यायचा आहे. येणाऱ्या 20 तारखेला सुभाष बाबांना द्या. मोदी साहेबांना आशीर्वाद द्यायचा आहे. सुरवाडे जामखेड योजनेचा पाठपुरावा सुभाष भामरे यांनी केला 2700 कोटी रुपये मोदींनी या योजनेसाठी दिले. तापी बुराई योजनेसाठी 800 कोटी रुपये आपण दिले आहेत. त्याचाही काम लवकर आपण पूर्ण करणार आहोत. पश्चिमे वाहिन्यांचा पाणी पूर्वकडे आणून खानदेशाचा आणि मराठवाड्याचा याचा चित्र देणाऱ्या काळात बदलावर आहोत. खासदार सुभाष भामरे यांनी रेल्वेचं पाण्याचे निकाली काढले, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी सुभाष भामरे यांच्या कामाचं कौतुक केलं.