गणपती विसर्जनाला गालबोट! ट्रॅक्टरखाली तीन बालकांचा मृत्यू, सहाजण जखमी, गाव झाले सुन्न
राज्यभरात मोठा उत्साहातमध्ये गणपती बाप्पाला निरोप दिला जात आहे. मात्र अशातच एक खळबळजनक बातमी समोर आली आहे ज्यामुळे गणपती विसर्जनाला गालबोट लागलं आहे. विसर्जन मिरवणुकीदरम्यान तीन बालकांचा मृत्यू झाला आहे.
राज्यभरात गणपती बाप्पाला निरोप दिला जात आहे. मोठ्या जल्लोषात बाप्पाची मिरवणूका निघाल्या असून गणेशभक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. अशातच एक वाईट बातमी समोर आली आहे. गणेश विसर्जनाची मिरवणूक सुरू असताना ट्रॅक्टर खाली आल्याने तीन लहान बालकांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत. तीन बालकांचा जागेवरच दुर्दैवी मृत्यू झाल्याने गाव सुन्न झालं आहे.
नेमकं काय घडलं?
धुळे जिल्ह्यातील चितोड गावात गावातील एकलव्य श्री गणेश मित्र मंडळाच्या वतीने ट्रॅक्टरवर गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली होती. दरम्यान विसर्जन मिरवणुकीत ट्रॅक्टर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर विसर्जन मिरवणुकीत शिरला. एवढी ट्रॅक्टर पुढे नाचणारे तीन लहान बालक ट्रॅक्टरच्या चाकाखाली आल्याने त्यांच्या जागीच मृत्यू झाला असून या दुर्घटने साजन जखमी झाले आहेत जखमींना धुळ्यातील भाऊसाहेब हिरे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून ट्रॅक्टर चालक हा मध्य धुंदीत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान संपूर्ण प्रकरणाचा तपास धुळे तालुका पोलीस करत आहेत. संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
पोलिसांनी गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीवेळी गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना वाहतुकीला काही अडखळा होणार नाही याची काळजी घ्यायला सांगितली आहे. त्यासोबतच मिरवणुकीवेळी कोणताही अपघात होणार नाही याची खबरदारी घ्यायला सांगितली आहे. धुळ्यामधील घटनेमध्ये ट्रॅक्टर चालकाने दारू प्यायली असल्याची माहिती समजत आहे. परंतु या निष्काळजीपणामुले चिमुकल्या गणेशभक्तांना आपला जीव गमवावा लागला आहे.
दरम्यान, राज्यभरात मोठ्या गणेश मंडळांच्या मिरवणुका निघाल्या आहेत. आपल्या कुटूंबासह मिरवणुकांना जात असाल तर आपल्या परिवारामधील सर्वांची काळजी घ्या. पोलिसांचा मोठा फौजफाटा बंदोबस्तासाठी आहे. मात्र आपणही काळजी घ्यायला हवी.