Leopard Attack : शिवारात बांधलेल्या गाईच्या वासरावरती बिबट्याचा हल्ला, महिनाभरापासून बिबट्या एकाच ठिकाणी, वनविभाग…
DHULE NEWS : एक महिन्यापासून बिबट्या एकाच जागेवर आहे. याच्याआगोदर सुध्दा बिबट्याने हल्ला केला आहे. नुकताच बिबट्याने केलेला हल्ला अधिक भयानक होता. त्यामुळे लोकांच्यामध्ये भीतीचं वातावरणं पसरलं आहे.
धुळे : धुळे (Dhule) तालुक्यात असलेल्या आर्णी गावाच्या (ARNI VILLAGE) शिवारात बिबट्याने (Leopard Attack) मध्यरात्रीच्या सुमारास शेतकरी हिम्मत बारकू माळी यांच्या शेतात बांधलेल्या गायचा एका वासरूवर हल्ला केला. या हल्ल्यात वासराचा मृत्यू झाला असून, वासराच्या शरीराच्या मानेकडचा भाग बिबट्याने फाडून टाकला आहे. या भागात बिबट्याची एक महिन्यापासून दहशत कायम आहे, एक महिन्यापूर्वी देखील अशीच एक घटना आर्णी गावाच्या शिवारात घडली होती. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.
नेमकं काय झालं
धुळे तालुक्यातील आर्णी गावाच्या शिवारातील शेतात हिम्मत बारकू माळी यांचे शेत आहे. त्यांच्या शेतात हे वासरू बांधलेलं होतं. मध्यरात्री बिबट्याने या वासरूवर हल्ला करून त्याला ठार केले. हिम्मत बारकू माळी यांच्या कुटुंबाला सोमवारी सकाळी हा प्रकार समजला. याबाबत वनविभागाला कळविण्यात आले आहे. गेल्या एक महिन्यापूर्वी अशीच एक घटना गाव परिसरात घडली होती. बिबट्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करा अशी मागणी शेतकऱ्यांतर्फे करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात बिबट्याची संख्या अधिक आहे. ज्या भागात उसाची शेती अधिक आहे. तिथं मोठ्या प्रमाणात बिबट्याचं प्रमाण असल्याचं आढळून आलं आहे. आतापर्यंत बिबट्यांनी शेतकऱ्यांवर अनेकदा हल्ला केला आहे. त्यामध्ये काही शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे, तर काही शेतकरी जखमी झाले आहेत. काही बिबट्यांना वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात जंगलात सोडले आहे.
नाशिक, पुणे, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी या जिल्ह्यात बिबट्याचे प्रमाण अधिक आहे. या जिल्ह्यांमध्ये बिबट्याच्या संदर्भातल्या रोज घडामोडी पाहायला मिळतात. बिबट्याचं प्रमाण अधिक असल्याने शेतकरी रात्री शेतात जाण्यास घाबरत आहेत.