Dhule Crime : कर्नाटकात सोने चोरी करणाऱ्या मध्य प्रदेशातील टोळीला धुळे पोलिसांकडून अटक

आरोपींकडे गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता सुरवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र त्यांना स्थानिक गुन्हे शाखेत आणून विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. ब्रीझा गाडीमध्ये लपवून ठेवलेले 18 लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने काढून दिले. आरोपींना पुढील कारवाईकरीता कर्नाटक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Dhule Crime : कर्नाटकात सोने चोरी करणाऱ्या मध्य प्रदेशातील टोळीला धुळे पोलिसांकडून अटक
कर्नाटकात सोने चोरी करणाऱ्या मध्य प्रदेशातील टोळीला धुळे पोलिसांकडून अटकImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 20, 2022 | 4:54 PM

धुळे : कर्नाटक येथे सोने चोरी (Gold Theft) करणारी मध्यप्रदेश राज्यातील टोळी (Gang) धुळे पोलिसांकडून जेरबंद करण्यात आली आहे. या कारवाईत चार आरोपींना बेड्या (Arrest) ठोकण्यात आल्या असून त्यांच्याकडून ब्रीजा गाडीमध्ये लपवून ठेवलेले 18 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले आहे. या आरोपींना पुढील कारवाईकरीता कर्नाटक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली. मुंबईहून मंगलोरला जाणाऱ्या खासगी बसमधून 18 लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरी करण्यात आले होते. याप्रकरणी कर्नाटकातील कुंदापुरा तालुक्यातील बाइंदुर पोलीस ठाण्यात 16 जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अमजद खान हुसेन खान (33 रा. धरमपुरी मध्य प्रदेश), अली खान हुसेन खान (31, रा. धार, मध्य प्रदेश), इकरार खान मुखतार खान (30 धार, मध्य प्देश), गोपाल पप्पू अमलवार (35 रा. धार, मध्य प्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींकडे गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता सुरवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र त्यांना स्थानिक गुन्हे शाखेत आणून विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. ब्रीझा गाडीमध्ये लपवून ठेवलेले 18 लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने काढून दिले. आरोपींना पुढील कारवाईकरीता कर्नाटक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सापळा रचून आरोपींना अटक केले

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मारुती ब्रीझा कार औरंगाबादकडून धुळे मार्गे मध्यप्रदेश राज्यात जाणार असल्याबाबत 19 जून रोजी माहिती प्राप्त झाली होती. तसेच आरोपीच्या शोधासाठी कर्नाटक येथील पथक देखील धुळे येथे हजर झाले होते. त्याअनुषंगाने पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखा, सोनगीर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील व पथक तसेच कर्नाटक पोलीस यांनी सोनगीर टोल नाका येथे सापळा रचला. मारुती ब्रीझा कार धुळ्याकडून सोनगीर टोल नाक्यावर येताच पोलिसांनी सदर वाहनास अडथळा करून अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र ब्रीझा गाडीच्या चालकाने पोलिसांच्या खाजगी वाहनाला धडक देऊन पळून जाण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांनी बळाचा वापर करुन ब्रीझा गाडीतून चार आरोपींना ताब्यात घेतले. (Dhule police arrest gang in Madhya Pradesh for stealing gold in Karnataka)

हे सुद्धा वाचा

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.