माजी पोलीस अधिकाऱ्याचा भाजपामध्ये प्रवेश; धुळे लोकसभा मतदारसंघातून उतरणार मैदानात?
प्रशासकीय आणि शैक्षणिक बाबींमध्ये अग्रेसर असलेल्या दिघावकरांचा राजकीय मैदानामध्ये किती निभाव लागेल, याबद्दल शंका व्यक्त केली जात आहे.

मनेश मासोळे, प्रतिनिधी, धुळे : माजी पोलीस अधिकारी यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. ते धुळे लोकसभा मतदार संघातून भाजपाकडून उमेदवारी लढणार असल्याची चर्चा रंगली आहे. प्रशासकीय कारकिर्दीनंतर राजकीय कारकिर्दीत ते किती यशस्वी होईल, हे येणारी वेळच सांगेल. धुळ्यात विद्यमान खासदार डॉक्टर सुभाष भामरे हे मुरब्बी राजकारणी आहेत. त्यांनी समतोल विकास साधण्याचं काम केलं. डॉ. भामरे यांचे बागलाण, मालेगाव, धुळे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील काम चांगले आहे. अशावेळी नाशिक विभागाचे माजी विशेष पोलीस महानिरीक्षक प्रदीप दिगावकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे भाजपामध्ये अंतर्गत स्पर्धा होण्याची शक्यता आहे.
शैक्षणिक, प्रशासकीय अनुभव
प्रदीप दिघावकर यांच्याकडे शैक्षणिक आणि दीर्घ प्रशासकीय अनुभव आहे. महाराष्ट्रामध्ये विविध भागांमध्ये त्यांनी काम केलं आहे. तसेच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जावर त्यांनी अनेक क्षेत्रांमध्ये आपला लौकिक मिळवला आहे. राजकीय मैदानामध्ये त्यांचा निभाव लागणं हे संघर्षमय असू शकतं, असं मत ज्येष्ठ पत्रकार हेमंत मदाने यांनी व्यक्त केलं.
दिघावकरांचा राजकारणात निभाव लागणार?
धुळे लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपकडून उमेदवारी मिळावी, यासाठी प्रदीप दिगावकर प्रयत्नशील असल्याचं कळते. प्रशासकीय आणि शैक्षणिक बाबींमध्ये अग्रेसर असलेल्या दिघावकरांचा राजकीय मैदानामध्ये किती निभाव लागेल, याबद्दल शंका व्यक्त केली जात आहे.
धुळे भाजपमध्ये अंतर्गत स्पर्धा प्रचंड आहे. दिग्गज राजकारण्यांमध्ये दिघावकर आपली उमेदवारी आणतील कशी? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दिघावकर प्रशासकीय दृष्ट्या मोठे अधिकारी होते. मात्र त्यांची प्रशासकीय कारकीर्द ही राजकीय कारकिर्दीमध्ये किती योगदान देऊ शकेल? याबाबत ही शंका व्यक्त केली जात आहेत.
भाजपामध्ये विद्यमान स्थितीमध्ये इच्छुक उमेदवारांची मोठी संख्या आहे. लोकसभेसाठी अनेक उमेदवार इच्छुक असल्याने दिघावकरांची त्यात भर पडलेली आहे. त्यातच महाविकास आघाडीकडनं दिला जाणारा उमेदवार ही महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतो.
आशा फलतृप्त होणार
नाशिक जिल्ह्यातील उमेदवार दिला गेला तर भाजप धुळे जिल्ह्यातील उमेदवाराला प्राधान्य देईल. अशा परिस्थितीत दिगावकरांची उमेदवारी धोक्यात येऊ शकते. त्यांचा विचार हा कुठल्या परिस्थितीत केला जाईल, याबाबतही शंका आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्य पदी असलेल्या देगावकरांनी भाजपमध्ये येऊन चूक तर केली नाही ना? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. ज्या लोकसभा उमेदवारीच्या आशेने ते आलेले आहेत ती आशा कितपत फलतृप्त होते हे येणाऱ्या काळातच निश्चित होणार आहे .