मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही; मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या मंत्र्याने दिले संकेत
मंत्रिमंडळाच्या विस्ताराविषयी बोलताना भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले की, मंत्रिमंडळ विस्तार हा वरिष्ठस्तरावर घेतला जाणारा निर्णय आहे.
धुळेः महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर शिंदे गटाचे सरकार अस्तित्वात आले. त्यांच्यावर असंविधानिकतेचा शिक्का मारत हे सरकार जास्त काळ टिकणार नाही अशी वारंवार टीका केली जात आहे. आताही त्यांच्यावर वारंवार टीका केली जात असतानाच मंत्रिमंडळ विस्ताराचा विषयही अनेकदा चर्चेत आला होता. त्यावर शिंदे गटातील आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार असल्याचे सांगितले होते.
ते आताही मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार असंही सांगितले जात असतानाच भाजपचे मंत्रि गिरीश महाजन यांनी मात्र मंत्रिमंडळाचा विस्ताराला उशीर होत असल्याचे मान्य केले आहे.
त्याचबरोबर त्यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार हा वरिष्ठांच्या निर्णयानंतरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असं गिरीश महाजन यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
मंत्रिमंडळाच्या विस्ताराविषयी बोलताना भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले की, मंत्रिमंडळ विस्तार हा वरिष्ठस्तरावर घेतला जाणारा निर्णय आहे.
मंत्रिमंडळाचा कुणीही, काहीही अर्थ लावत असलं तरी, मुख्यमंत्र्यांच्या जवळचे असलेले गिरीश महाजन यांनी मंत्रिमंडळ विस्तार मात्र हा सर्वस्वी वरिष्ठांच्या निर्णयावर निर्भर असल्याचेच स्पष्ट केले.
आपल्या धुळे जिल्ह्याच्या दौऱ्याप्रसंगी महाजन यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत विचारणा केली होती. त्याबद्दल बोलताना त्यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार हा राज्याचा विषय नाही तर तो पक्षातील वरिष्ठांच्या मतानुसार निर्णय होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी गिरीश महाजन यांनी विस्ताराला उशीर होत असल्याचेही कबूल केलं. तसंच वरिष्ठांच्या निर्णयानंतरच मंत्रिमंडळ विस्तार केला जाणार असून त्यांच्याप्रमाणेच निर्णय होणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
त्यांच्या या वक्तव्यामुळे विस्ताराबाबत अजूनही कोणताही निर्णय झाल्याचं मात्र स्पष्ट झाले आहे. अशात मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही असे संकेत त्यांच्या या वक्तव्यावर मिळत आहेत. त्यामुळे आता उलटसुलट चर्चेना उधान आले आहे.