Ladki Bahin Yojana : KYC साठी बँकेत तोबा गर्दी, मग झाली चेंगराचेंगरी; लाडक्या बहिणींना भोवळ आली
Bank Stampede : लाडकी बहीण योजनेला राज्यात महिलांचा उदंड प्रतिसाद मिळाला. पण योजनेसाठी कागदपत्रांचा पुर्तता करण्यासाठी महिलांना मोठी कसरत करावी लागत आहे. बँकिंग आणि प्रशासकीय यंत्रणेवर पण त्याचा एकच ताण आला आहे. या जिल्ह्यात तर चेंगराचेंगरीत महिला भोवळ येऊन पडल्या.
लाडकी बहीण योजन राज्यात चांगलीच लोकप्रिय ठरली. या योजनेसाठी कागदपत्रांची पुर्तता करण्यासाठी कोण झुंबडी उडाली आहे. तहसील कार्यालय, सेतू, बँकांसमोर महिलांची रांगच रांग लागली आहे. महिलांना या योजनेसाठी मोठी कसरत करावी लागली तर आता बँकेत केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी बँकेत पण मोठी गर्दी झाली आहे. गर्दी आवरण्यासाठी पोलीस यंत्रणा पण कमी पडत असल्याने चेंगराचेंगरीच्या घटना घडत आहेत.
दोन महिलांना आली भोवळ
नंदूरबार जिल्ह्यातील धडगाव स्टेट बँक शाखेत महिलांची चेंगराचेंगरी झाली. ई केवायसी साठी आणि पैसे काढण्यासाठी आदिवासी महिलांची सकाळपासून बँकांसमोर तुफान गर्दी झाली होती. बँकेच्या आणि पोलीस विभागाच्या कुठलाच नियोजन नसल्यामुळे महिलांना तासनतास रांगेत उभं राहावं लागत आहे. चेंगराचेंगरीत 2 महिला बेशुद्ध पडल्या होत्या. गर्दीमध्ये दोन महिलांचे प्रकृतिक खराब झाल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
केवायसीसाठी स्वतंत्र रांग आणि हवा येण्यासाठी पुरेशी व्यवस्था नसल्याने हा प्रकार घडला. ज्या ठिकाणी महिलांची गर्दी झाली होती, ती जागा अरुंद असल्याचे समोर आले आहे. तोबा गर्दीमुळे महिलांना श्वास घ्यायला पण अडचण येत होती. त्यामुळे येथे उपस्थित काही महिलांना मोठा त्रास झाला. त्यातील दोन महिलांना भोवळ आली. पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर हा प्रश्न तात्पुरता सुटला.
महिलांचा विनयभंग
ई केवायसीसाठी आदिवासी महिलांची सकाळपासून बँकांसमोर तुफान गर्दी दिसली. ई केवायसी करण्यासाठी भर पावसात बँकेसमोर एक ते दोन किलोमीटर पर्यंतचा रांगा पाहायला मिळाली. बँकेत महिला आणि पुरुषांची स्वतंत्र रांग नसल्याने अनेक महिलांसोबत छेडखानी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. मात्र छेडखानी संदर्भात कोणत्याही महिलेचे पोलिसात अद्यापही तक्रार नाही. योजना जरी चांगले असते मात्र याच्यात होणारा त्रास अधिक असल्याने महिलांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. अनेक बँकेत चेंगराचेंगरीचे प्रकार होत आहे मात्र बँकेच्या बाहेर कुठलेही सुरक्षा रक्षक दिसत नाही आहे….