कांद्याला खासगी कृषी उत्पन्न बाजार समिती देते जास्त भाव, कांदे विक्रीसाठी शेतकऱ्यांची गर्दी

धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत साधारण दोन ते अडीच हजार क्विंटल कांद्याची आवक होते आहे. दुसरीकडे खाजगी कृषी उत्पन्न बाजार समितीत याच कांद्याची आवक दहा ते बारा हजार क्विंटल होत आहे.

कांद्याला खासगी कृषी उत्पन्न बाजार समिती देते जास्त भाव, कांदे विक्रीसाठी शेतकऱ्यांची गर्दी
Follow us
| Updated on: Jun 13, 2023 | 4:34 PM

मनेश मासोळे, प्रतिनिधी, धुळे : धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती कांद्याला भाव नाही. आवक कमी झाली असताना दुसरीकडे मात्र खाजगी कृषी उत्पन्न बाजार समिती कांद्याला चांगला भाव आहे. त्यामुळे आवक वाढली आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कांदे विक्रीसाठी शेतकरी येऊ लागले आहेत. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे धुळे जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसला. त्यातून तो शेतकरी सावरतो ना सावरतो तेवढ्यात कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला दर नाहीत. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत 100 रुपयांपासून 900 रुपयांपर्यंत कांद्याला दर आहेत.

खासगी बाजार समितीत कांद्याची आवक जास्त

खाजगी कृषी उत्पन्न बाजार समिती 300 रुपयापासून अकराशे रुपयापर्यंत कांद्याला दर दिला जात आहे. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत साधारण दोन ते अडीच हजार क्विंटल कांद्याची आवक होते आहे. दुसरीकडे खाजगी कृषी उत्पन्न बाजार समितीत याच कांद्याची आवक दहा ते बारा हजार क्विंटल होत आहे.

onian 2 n

खासगीत लागत नाही तोलाई, मोजाई, हमाली

धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा विक्रीसाठी नेतात. त्यानंतर तोलाई, मोजाई , हमाली, गोणीचे दर यामुळे शेतकऱ्यांना धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा विक्री करणे परवडत नाही. त्यामुळे शेतकरी खाजगी कृषी उत्पन्न बाजार समितीकडे वळला आहे. खाजगी कृषी उत्पन्न बाजार समिती मात्र कुठल्याही पद्धतीने तोलाई, मोजाई, हमाली हे लागत नाही.

खासगी बाजार समितीत कांदा विक्री

गोणीचे पैसे देखील लागत नाही. रोख रक्कम मिळत असल्याने शेतकरी खाजगी कृषी उत्पन्न बाजार समिती आपला कांदा विक्री करू लागला आहे. शेतकऱ्यांनी कांदा विकल्यानंतर ताबडतोब रोख रक्कम मिळते. मात्र तसे धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत होत नाही. त्या ठिकाणी पंधरा दिवसांचा चेक किंवा ऑनलाईन पेमेंट दिले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना थांबावे लागते. हे परवडत नसल्याने अनेक शेतकरी खाजगी कृषी उत्पन्न बाजार समितीकडे आपला कांदा विक्री करू लागले आहेत.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.