17 जातींना घेताना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागला नाही का?; मनोज जरांगे यांचे सरकारला दोन प्रश्न
मनोज जरांगे यांनी आज नारायण गडावर दसरा मेळावा साजरा केला. या मेळाव्याला प्रचंड गर्दी झाली होती. बीडमध्ये प्रचंड उन्हाच्या तडाख्यात लोक या मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने आली होती.
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दसरा मेळाव्या नारायण गडावर जोरदार भाषण केले आहे.त्यांनी आचारसंहिता लागायच्या आता मराठा समाजाला आरक्षण देण्याची घोषणा करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.आमच्या ताटात येऊ नका ? असे वारंवार म्हटले जात आहे. आधीच भरपूर जाती असल्याचे म्हटले जात आहे. मग तुम्ही काल परवा मोठी सतरा जाती आरक्षणात घेतल्या तेव्हा तुम्हाला धक्का लागला नाही का ? असाही सवाल मनोज जरांगे यांची यावेळी केला.
मनोज जरांगे यांनी यावेळी भाषणात मराठ्यांना आरक्षणाची सर्वात जास्त गरज असल्याचे सांगितले. ते पुढे म्हणाले की आमची आरक्षणाची मागणी १४ महिन्यापासून आहे. परंतू एकही मागणी मान्य केली नाही. फक्त सांगताना सांगितलं, तुम्ही आमच्यात येऊ नका. तुम्ही आल्याने धक्का लागतोय. आमच्या ताटात खाऊ नका. आमच्या ताटात येऊ नका. आमच्या ताटात आल्याने आमचं संपतंय. तुम्ही आमच्यात मागणी करू नका. आधीच भरपूर आहेत. ४०० ते ४५० जाती आहेत. आमचं कमी होतंय. आता मला याचं उत्तर हवंय असेही जरांगे पाटील यावेळी म्हणाले.
धक्का लागतो म्हणणारा कुठे आहे?
माझ्या समाजाला शब्द आणि उत्तर पाहिजे. तुम्ही काल परवा मोठ्या १७ जाती आरक्षणात घातल्या. आता तुम्हाला धक्का लागला नाही का? धक्का लागतो म्हणणारा कुठे आहे. आमच्यात येऊ नका म्हणणारा कुठे आहे. हा काय द्वेष. इतका द्वेष मराठ्यांचा का. ओबीसींचा द्वेष का.? तुम्हीच म्हटला गोरगरीब ओबीसींच्या आरक्षणात धक्का नको. मग १७ जाती टाकताना गोरगरीब ओबीसींचा विचार का केला नाही का असाही सवाल जरांगे यांनी यावेळी केला. ते पुढे म्हणाले की दुसरा प्रश्न, जेव्हा आम्ही आरक्षण मागितलं तेव्हा एकजण म्हणाला, तुम्हाला आरक्षण हवं असेल तर महाविकास आघाडीकडून लिहून घ्या. तरच आरक्षण देतो. तुम्ही १७ जाती घातल्या, तुम्ही महाविकास आघाडीकडून लिहून घेतलं का. मराठ्यांना गोरगरीब ओबींसींनी, मुस्लिम, दलितांना न्याय देताना एक न्याय द्यायचा, दुसऱ्यांना वेगळा न्याय. गडावरून जातीधर्मावर बोललं जाणार. पण जातीचा उल्लेख करणार नाही.