औरंगाबादच्या शांततेला धोका! काय आहे कारण?
लव्ह औरंगाबाद, तर कुठे सुपर संभाजीनगर असे फलक शहरात दिसत आहेत. याच फलकावरुन शहरातील शांततेला धोका असल्याची भीती पोलिसांनी व्यक्त केली आहे.
औरंगाबाद: डीजिटल फलकावरुन औरंगाबाद शहरातील वातावरण चांगलंच तापलं आहे. कुठे ‘लव्ह औरंगाबाद’, तर कुठे ‘सुपर संभाजीनगर’ असे फलक लावण्यात आले आहेत. पण आता याच फलकावरुन औरंगाबाद शहरातील शांततेला धोका निर्माण झाल्याची भीती औरंगाबाद पोलिसांकडून व्यक्त करण्यात आली आहे. याबाबत सिडको पोलिसांनी गोपनीय अहवालही बनवला आहे. (Digital board threatens the peace of Aurangabad city)
औरंगाबाद शहराचं नाव बदलण्याचा मुद्दा अनेकदा चर्चेत येत असतो. महापालिकेत तसा प्रस्तावही मांडण्यात आला होता. आता लव्ह औरंगाबाद, तर कुठे सुपर संभाजीनगर असे फलक शहरात दिसत आहेत. सिडको टीव्ही सेंटर परिसरात सुपर संभाजीनगर नावाचा फलक लावण्यात आला आहे. शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांच्या एनजीओकडून हा फलक बसवण्यात आलाय. आता याच फलकावरुन शहरातील शांततेला धोका असल्याची भीती पोलिसांनी व्यक्त केली आहे.
महापालिका आयुक्तांची परवानगी
सुपर संभाजीनगर फलकाला महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडे यांनी परवानगी दिली आहे. त्यानुसार सिडको परिसरात हा फलक लावण्यात आला आहे. पण आता या फलकामुळे शहरात तणाव निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या फलकामुळे शहरातील वातावरण खराब होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
सुपर संभाजीनगरला MIM चा विरोध
सुपर संभाजीनगर या फलकावरुन एमआयएमने शिवसेनेवर टीका करत महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकारण होत असल्याचा आरोप केला आहे. इम्तियाज जलील यांनी ट्विटरवर पोस्ट टाकत शिवसेना चीप राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे.
Oh! Aurangabad Municipal elections dates seem to have been finalised! Every 5 years Sena-BJP bring this issue out so that nobody questions about water, sanitation, roads, gardens, open spaces, jobs! It has been installed right in front of tv centre police chowki! Surprising!! pic.twitter.com/n77i5NR5dY
— imtiaz jaleel (@imtiaz_jaleel) December 19, 2020
‘लव्ह औरंगाबाद’ फलकाची तोडफोड
लव्ह औरंगाबाद या सेल्फी पॉईंटची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून या प्रकरणी तपास सुरु करण्यात आला आहे. शहरातील छावणी परिसरात लव्ह औरंगाबाद हा सेल्फी पॉईंट तयार करण्यात आला होता. या सेल्फी पॉईंटची अज्ञातांनी तोडफोड केली आहे.
लव्ह औरंगाबाद आणि सुपर संभाजीनगर वाद
स्मार्ट सिटीच्या कॅम्पेनिंग मध्ये संभाजीनगर नावाचा उल्लेख केल्यामुळे औरंगाबादेत पुन्हा एकदा वादाला सुरुवात झाली होती. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहराचं पूर्वीचं नाव असलेलं खडकी, औरंगाबादचे फलक लावण्यात आले. त्यात आय लव्ह औरंगाबाद, लव्ह प्रतिष्ठान, लव्ह खडकी असे डिस्प्ले लावून सेल्फी पॉईंट तयार करण्यात आले आहेत. शिवसेना आमदार अंबादास दानवे दानवे यांच्या मातृभूमी प्रतिष्ठाने शहरातील टीव्ही सेंटर भागातील संभाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ “सुपर संभाजीनगर” असा डिस्प्ले तयार केला आहे.
संबंधित बातम्या:
औरंगाबादच्या नामकरणाचा पुन्हा वाद , MIMचं शिवसेनेवर टीकास्त्र
Subhash Desai | औरंगाबादचे सुपर संभाजीनगर करणार, सुभाष देसाईंचं वक्तव्य
Digital board threatens the peace of Aurangabad city