तुकाराम मुंढेंचा पुन्हा तोच दरारा… मध्यरात्री रुग्णालयात भेट देत कारवाईचा इशारा
आयुक्त आरोग्य सेवा आणि संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान पदाचा पदभार स्वीकारताच मुंढे यांनी कामाचा धडाका लावला आहे.
पुणे : तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) अधिकारी म्हंटलं त्या विभागाच्या अधिकाऱ्यांना एकप्रकारे धडकीच भरलेली असते. त्याचे कारण म्हणजे कडक शिस्तीचे अधिकारी आणि कर्तव्य कठोर अधिकारी म्हणून तुकाराम मुंढे यांची ओळख आहे. तुकाराम मुंढे यांच्या निदर्शनास जर एखादा अधिकारी आणि कर्मचारी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी आढळून आले तर थेट कारवाई करणारे अधिकारी म्हणून ओळखली जाते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून थेट नागरिकांशी निगडीत खात्याशी तुकाराम मुंढे यांचा संबंध नव्हता. मात्र, शिंदे – फडणवीस सरकारने (Shinde – Fadanavis Goverment) केलेल्या 44 अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये तुकाराम मुंढे यांची बदली करण्यात आली आहे. आरोग्य सेवेच्या आयुक्तपदी आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
आयुक्त आरोग्य सेवा आणि संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान पदाचा पदभार स्वीकारताच मुंढे यांनी कामाचा धडाका लावला आहे.
तुकाराम मुंढे यांनी राज्यात दौरा सुरू केला असून प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण भागातील रुग्णालये, जिल्हा रुग्णालय येथे रात्रीच्या वेळी धाडसत्र सुरू केले आहे.
रुग्णालयात पाहणी करत असताना डॉक्टरांनी उपस्थित राहण्याचे आदेश मुंढे यांनी दिलेले असून आरोग्य यंत्रणेने सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहे.
नुकतीच तुकाराम मुंढे यांनी पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात भेटीस सुरुवात केल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून अधिकारी कर्मचाऱ्यांना धडकी भरली आहे.
आळंदी, वाघोली येथील ग्रामीण रुग्णालयात केली तपासणी करत असतांना डॉक्टर उपस्थित असल्याने त्यांच्यावरील कारवाई टळली आहे.
पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांची भूमिका पाहून आरोग्य विभागात खळबळ उडाली असून मुंढे यांचा दरारा पाहून नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.