विधानसभेत पेपर फुटीवरुन चर्चा, फडणवीसांकडून थेट गुन्हा दाखल करण्याचा इशारा

| Updated on: Jul 01, 2024 | 9:37 PM

विधानसभेत आता विरोधकांनी पेपर फुटीचा मुद्दा उपस्थित केला. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी थेट कारवाईचा इशारा दिला आहे. याशिवाय या सदर्भात कायदा आणणार असल्याचंही त्यांनी सांगितले.

विधानसभेत पेपर फुटीवरुन चर्चा, फडणवीसांकडून थेट गुन्हा दाखल करण्याचा इशारा
Follow us on

विधानसभेत पेपर फुटीवरुन चर्चा झाली. विरोधकांनी विशेषत: भास्कर जाधवांनी फडणवीसांना घेरताना एक यादीच वाचली. मात्र ही यादी व्हॉट्सअॅपवर व्हायरल असून त्या वेबसाईटवरच गुन्हा दाखल करण्याचा इशारा फडणवीसांनी दिला आहे. रोहित पवारांनी तलाठी, जलसंधारणापासून अनेक विभागातले पेपर फुटले. त्यामुळं याच अधिवेशनात पेपर फुटीवरुन कायदा करणार का ? असा सवाल केला. त्यावर पेपर फुटी म्हणजे फेक नरेटिव्ह असल्याचं गृहमंत्री फडणवीस म्हणाले आहेत.

1 लाख नियुक्त्यांचा टप्पा गाठणार असून विरोधकांकडून पेपरफुटीचा फेक नरेटिव्ह पसरवला जात असल्याचं गृहमंत्री म्हणालेत.. पुन्हा ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधवांनी, पेपर फुटीची यादी वाचून दाखवली…मात्र हाही फेक नरेटिव्हच असून भास्कर जाधवांनी पुण्याच्या एका वेबसाईटवरुन पसवलेला मेसेज वाचून दाखवला. त्यामुळं आता त्या वेबसाईट विरोधात गुन्हा दाखल करण्याचा पवित्रा फडणवीसांनी घेतला.

महाविकास आघाडीनं 75 हजार सरकारी नोकऱ्यांचं आश्वासन दिलं होतं. तो आकडा महायुतीच्या सरकारमध्ये 77 हजार 305 वर गेल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

सरकारी गट क दर्जाची परीक्षा सुद्धा MPSCद्वारे घेणार असल्याची घोषणाही फडणवीसांनी केली. सरकारी पद भरतीच्या परीक्षांमध्ये पेपरफुटीचा आरोप विरोधकांनी केला. मात्र पेपर फुटी, पेपर फुटी म्हणत खोटी माहिती पसरवली जात असल्याचा उलट आरोप फडणवीसांनी केला. अर्थात याच अधिवेशनात पेपरफुटीचा कायदा येणार ही एक चांगली बाब आहे.

NEET UG परीक्षेचा पेपर फुटल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. या मुद्द्यावर विद्यार्थ्यांनी रस्त्यावर निदर्शने केली आणि त्याचे पडसात संसदेच्या कॉरिडॉरमध्येही ऐकू आले. NEET UG पेपर लीकच्या वाढत्या वादाच्या पार्श्वभूमीवर सरकार एक मोठे पाऊल उचलणार आहे. अहवालानुसार, पुढील वर्षापासून NEET UG परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यावर विचार केला जात आहे.

आतापर्यंत NEET परीक्षा पेन आणि पेपरद्वारे घेतली जात होती. ज्यामध्ये MCQ प्रकारचे प्रश्न विचारले जातात. परंतु, येत्या काही दिवसांत, IIT, JEE Main किंवा JEE Advanced सारख्या संगणकावर आधारित परीक्षा देखील NEET UG साठी स्वीकारल्या जाऊ शकतात.