“56 नाही, त्यापेक्षा जास्त आकडा लोक सांगतात…” सुषमा अंधारेंचा टोला, चित्रा वाघ म्हणाल्या…
दिशा सालियनच्या मृत्यूप्रकरणी विधानसभेत मोठा वाद झाला. सतीश सालियान यांनी आदित्य ठाकरे यांच्यासह अनेकांवर हायकोर्टात आरोप केले. यावरून चित्रा वाघ यांच्या वक्तव्यावर सुषमा अंधारे यांनी टीका केली.

सेलिबेट्री मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यूप्रकरणावरुन काल विधानसभेत मोठे घमासान पाहायला मिळाले. दिशा सालियनचे वडील सतीश सालियान यांनी हायकोर्टात धाव घेतली. त्यांनी कोर्टात याचिका दाखल करत आदित्य ठाकरेंसह अनेकांवर गंभीर आरोप केले. आदित्य ठाकरे आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. आता या प्रकरणावरुन विधानसभेसह विधानपरिषदेतही गदारोळ झाला. यावरुन चित्रा वाघ यांनी टीका केली. चित्रा वाघ तुमच्यासारखे 56 पायाला बांधून फिरते. मी काय वशिल्याने आले नाही, असे विधान चित्रा वाघ यांनी केले होते. यावरुन आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी घणाघात केला आहे.
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी चित्रा वाघ यांच्यावर टीका केली आहे. सुषमा अंधारे यांनी नुकतंच त्यांच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी चित्रा वाघ यांच्यावर टीका केली आहे. त्यांना ही भाषा कोणत्या शाळा–कॉलेजात शिकवली जाते हे माहीत नाही, असे सुषमा अंधारेंनी म्हटले.
सुषमा अंधारेंची टीका
सभागृहाची सुसंस्कृत परंपरा, गरिमा धाब्यावर बसवत, एक बाई अत्यंत विचित्र आवाजात किंचाळत म्हणाल्या त्या 56 जण पायाला बांधून फिरते. ही भाषा त्यांना कोणत्या शाळा–कॉलेजात शिकवली जाते हे माहीत नाही. पण हे दरवेळी सांगायची गरज काय, त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आलेख सांगताना लोक यापेक्षा जास्त आकडा सांगतात!याबद्दल माझ्यापेक्षा अधिक आमदार जितेंद्र आव्हाड, मेहबूब शेख सारखे जाणकार अधिक विस्ताराने मांडू शकतील, असे सुषमा अंधारे म्हणाल्या.
सभागृहाची सुसंस्कृत परंपरा गरिमा धाब्यावर बसवत १बाई अत्यंत विचित्र आवाजात किंचाळत म्हणाल्या 56जण पायाला बांधून फिरते. ही भाषा कोणत्या शाळाकॉलेजात शिकवली जाते हे माहीत नाही. पण हे दरवेळी सांगायची गरज काय. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आलेख सांगताना लोक यापेक्षा जास्त आकडा सांगतात!
— SushmaTai Andhare (@andharesushama) March 20, 2025
चित्रा वाघ काय म्हणाल्या?
यावर चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “माझं नाव घेऊन प्रश्न विचारलं, त्याला मी उत्तर दिल, विषय दुसऱ्यांनी काढलं होता माजः विषय नव्हता , पण माझं नाव घेतलं म्हणून मी उत्तर दिलं. प्रत्येक वेळी महिलांना हलक्यात घेऊ शकत नाही. आम्ही रस्त्यावर पडलो नाही, जेव्हा तुम्ही आम्हाला बोलता तेव्हा आम्ही शब्द वापरले. तुम्ही दगड मारलं, तर तुमच्याकडेही दगड येणार. सुषमा अंधारेंच्या नेत्यांनी माझं नाव घेऊन विचारलं म्हणून मी उत्तर दिलं. ते ट्विट करून काय काय लिहितात? काय संबंध? संजय राऊत तुम्ही सर्वज्ञानी आहात, तुम्ही तर बोलूच नका”, अशा शब्दात चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिले.