ज्या राणेंनी मागणी केली त्यांच्याच विरोधात दिशाच्या कुटुंबाने तक्रार केली; आदित्य ठाकरे यांची पाठ राखण करत भास्कर जाधव यांनी कुणाला सुनावलं…
सिंधुदुर्गमधील रमेश गोवळेकरचा खून झाला त्याची चौकशी करा. वळूंचा खून झाला त्याची चौकशी करा, सिद्धार्थ नाईकांचा खून झाला त्याची चौकशी करा, पूजा चव्हाणलाही न्याय द्या अशी मागणी भास्कर जाधव यांनी केली आहे.
नागपूर : दिशा सालियानच्या मृत्यूप्रकरणाचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे. याच मुद्द्यावरून आमदार भरत गोगावले यांच्यासह नितेश राणे यांनी नागपूर अधिवेशनात मुद्दा उपस्थित करत आदित्य ठाकरे यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. यावर विधानसभेत गदारोळ झाल्याने विरोधी पक्षाच्या नेत्यांना सभागृहात बोलू दिले जात नाही. ज्या बाबी विरोधी पक्षाच्या अधिकारातील आहे, त्या बाबी सत्ताधारी करत आहे. जुना मुद्दा उकरून काढून काहीतर विषय भरकटविण्याचे काम सुरू असल्याचे म्हंटले आहे. संसदेत मांडलेला मुद्दा राज्य शासनाकडे मुद्दा उपस्थित करून सत्ताधारीच याबाबत खुलासा मागवत असतील तर ही आश्चर्यकारक गोष्ट असल्याचे भास्कर जाधव यांनी म्हंटले आहे. याशिवाय भास्कर जाधव यांनी थेट राणे यांच्यावर निशाणा साधत गंभीर आरोप करत काही मागण्या केल्या आहे. त्यांनी खुलासा मागितली त्यावर त्यांना बोलू द्या आणि आम्हालाही त्यावर बोलू द्या पण ते होऊ देत नाही असं भास्कर जाधव म्हणाले आहे.
अमित शहा हे केंद्रीय मंत्री आहे, दबंग नेता आहे, पण त्यांच्या मुद्द्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी किंमत न देण्याचे ठरविले आहे. तसेच महाराष्ट्र सरकारने ठरविले आहे.
केंद्रीय अखत्यारीत असलेली एजन्सी सीबीआयवर प्रश्न निर्माण केला आहे आणि संशय निर्माण करत आहे. मागेही अशीच राळ तेव्हा काही लोकांनी उठवली होती. पण हाताला काहीही लागलं नाही.
दिशा सालियान यांचे आई-वडील हे राष्ट्रपती यांना भेटले आणि माझ्या मुलीची बदनामी करत आहे म्हणून राणे यांच्याबद्दल तक्रार केली, त्यावर ते काहीही बोलत नाही, पण एनआयटी भूखंड प्रकरण पितळ उघडे पडणार म्हणून हा मुद्दा काढला.
रश्मी शुक्ल फोन टॅप प्रकरण देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्रश्न उपस्थित करत असल्याने मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघेही सभागृहात आज आलेले नाहीत, त्यांच्या सदस्यांच्या मार्फत गदारोळ घडवून आणला जात आहे.
तुम्हाला चौकशी करायची ना बिनधास्त करा, सरकार तुमच्या हातात आहे ना ? करा चौकशी तुम्हाला कुणी अडवलं आहे, पण यासोबत आणखी काही चौकश्या करा अशी मागणी जाधव यांनी केली आहे.
सिंधुदुर्गमधील रमेश गोवळेकरचा खून झाला त्याची चौकशी करा. वळूंचा खून झाला त्याची चौकशी करा, सिद्धार्थ नाईकांचा खून झाला त्याची चौकशी करा, पूजा चव्हाण हीलाही न्याय द्या अशी मागणी भास्कर जाधव यांनी केली आहे.
याशिवाय ज्या सदस्यांनी मागणी केली आहे त्यांना थेट सवाल करत पनवेल येथे सुनील जोशी यांचा खून झाला त्या खुनामध्ये कोण होतं? केंद्रातही तुमचं सरकार आहे करा चौकशी असं थेट आवाहन भास्कर जाधव यांनी सत्ताधाऱ्यांना केलं आहे.