Corona vaccine | सीरम इन्स्टिट्यूटच्या कोरोना प्रतिबंधक लसीचं लवकरच वितरण, राज्यात लसीकरण कधी?

पुण्यातील लोहगाव विमानतळावर हे कंटेनर पोहोचतील. त्यानंतर पुढील वाहतूक विमानातून होईल. देशातील विविध शहरात विमानातून ही लस पोहोचवण्यात येईल.

Corona vaccine | सीरम इन्स्टिट्यूटच्या कोरोना प्रतिबंधक लसीचं लवकरच वितरण, राज्यात लसीकरण कधी?
कोविशील्ड लस
Follow us
| Updated on: Jan 11, 2021 | 1:43 PM

पुणे: कोरोना विषाणूच्या नव्या प्रकाराचा धोका वाढण्याची शक्यता आहे. अशात कोरोना लसीमुळे मोठा दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यातच पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये निर्मिती सुरु असलेल्या कोविड प्रतिबंधक लसीचं वितरण आजपासून सुरु होण्याची शक्यता आहे. आज संध्याकाळीत किंवा उद्या सकाळी ही लस घेऊन जाणारे कंटेनर बाहेर पडणार असल्याची माहिती मिळतेय.(Distribution of Serum Institute corona vaccine is expected to start from today)

पुण्यातील लोहगाव विमानतळावर हे कंटेनर पोहोचतील. त्यानंतर पुढील वाहतूक विमानातून होईल. देशातील विविध शहरात विमानातून ही लस पोहोचवण्यात येईल. सीरम इन्स्टिट्यूटमध्ये त्यासंदर्भातील हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यामुळे सीरम इन्स्टिट्यूट परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना

16 जानेवारी म्हणजे येत्या शनिवारपासून देशात लसीकरणाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे आज रात्री किंवा उद्या सकाळपासून लसींचं वितरण सुरु होण्याची दाट शक्यता आहे. केंद्र सरकारनं सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेकच्या लसीच्या आपत्कालीन वापराला परवानगी दिली आहे. सीमच्या लसीचं उत्पादन पुण्यातून होत असल्यानं, तिथूनच देशभरात लसीचा पुरवठा केला जाणार आहे. त्याबाबत सुरक्षेच्या दृष्टीनं सर्व उपाययोजना करण्याचे निर्देश पुणे पोलिसांना दिले आहेत. लस वितरणात त्रृटी आढळू नयेत यासाठी अधिकारीवर्ग लक्ष ठेवून आहे. पोलिस आयुक्तांसह अतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचे नियोजित कार्यक्रम रद्द केले आहेत.

राज्यात 16 तारखेपासून लसीकरण- टोपे

महाराष्ट्रात 16 जानेवारीलाच लसीकरण मोहीमेला सुरुवात होणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. आता कोविशिल्ड की कोव्हॅक्सीन दिलं जाणार, याबाबत केंद्राचा अधिकार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. आपल्याला आपत्कालीन वापरासाठी 16 लाख डोसची आवश्यकता असल्याचं सांगतानाच, रोज 10 हजार कर्मचाऱ्यांना लस देण्याचं नियोजन असल्याचंही टोपे म्हणाले.

कोविशिल्ड लसीचे 4-5 कोटी डोस सर्वात आधी भारताला

‘कोविशिल्ड’चे 4-5 कोटी डोस सर्वप्रथम भारताला दिले जाणार आहेत, अशी माहिती सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून नुकतीच देण्यात आली आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आदर आदर पुनावाला म्हणाले की, कोरोना व्हॅक्सिन ‘कोविशिल्ड’चे 4-5 कोटी डोस सर्वात आधी भारताला दिले जातील.

2021 च्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये लसींची कमतरता दिसून येईल. परंतु ऑगस्ट-सप्टेंबर 2021 पर्यंत लस निर्मिती करणाऱ्या कंपन्या लसींचा पुरवठा करण्यात सक्षम होतील. दरम्यान, किती प्रमाणात लसी हव्या आहेत आणि त्या किती वेळात हव्या आहेत, हे सरकार ठरवणार आहे. जुलै 2021 पर्यंत लसींचे 30 कोटी डोस तयार करण्याचे आपले लक्ष्य असल्याचंही पुनावाला यांनी सांगितलं आहे.

संबंधित बातम्या:

तुमच्यापर्यंत लस कशी पोहोचणार, वॅक्सिनचा साठा ते लसीकरण 4 राज्यात रंगीत तालीम

ब्रिटनमध्ये कोरोनाचा आणखी एक घातक अवतार, वेगवान संसर्गामुळे खळबळ

Distribution of Serum Institute corona vaccine is expected to start from today

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.