Beed Lockdown | मोठी बातमी ! बीडमध्ये 12 मेपर्यंत लॉकडाऊन, काय सुरु काय बंद ?

| Updated on: May 07, 2021 | 7:43 PM

जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी बीड जिल्ह्यात 12 मे पर्यंत कडक लॉकडाऊन लागू केला आहे. (Beed district Lockdown)

Beed Lockdown | मोठी बातमी ! बीडमध्ये 12 मेपर्यंत लॉकडाऊन, काय सुरु काय बंद ?
Sindhudurg seven days lockdown
Follow us on

बीड : वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता बीड जिल्हाधिकाऱ्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी बीड जिल्ह्यात 12 मे पर्यंत कडक लॉकडाऊन लागू केला आहे. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद असतील. तसेच या काळात दररोज सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत फेरीवाल्यांना तसेच भाजीपला विक्री करण्यास मुभा असेल. (district collector Ravindra Jagtap imposed Lockdown in whole Beed district all institutions hotels restaurants general stores will be closed)

बीडमध्ये कडकडीत लॉकडाऊन

मागील अनेक दिवसांपासून राज्यात कोरोनाना हाहा:कार माजवला आहे. राज्यात रोज हजारो रुग्ण नव्याने आढळत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात जवळपास सारखीच परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाला थोपवण्यासाठी प्रत्येक जिल्हा प्रशासनाकडून स्थानिक पातळीवर खबरदारी म्हणून  वेगवेगळे निर्णय घेतले जात आहेत. बीड जिल्ह्यातसुद्धात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढलेला आहे. त्यामुळे येथील जिल्हा प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. बीड जिल्हा प्रशासनाने येत्या 12 मे पर्यंत जिल्ह्यात कडकडीत लॉकडाऊन लागू केला आहे. याकाळात नागरिकांना बाहेर पडण्यास निर्बंध असतील. तसेच, या काळात अत्यावश्यक सेवा वागळता सर्व आस्थापना या बंद ठेवण्यात येणार आहेत.

यापूर्वी 3 दिवसांचा लॉकडाऊन

यापूर्वी बीड जिल्हा प्रशासनाने 4 मे रोजी 3 दिवसांच्या कडक लॉकडाऊनची घोषणा केली होती. जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी तसे आदेश जारी केले होते. या काळात जर कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली तर लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात येईल असे जिल्हा प्रशासनाने सांगितले होते. मात्र, रुग्णसंख्येत घट न झाल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी 12 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला.

काय सुरु काय बंद ?

या काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद असणार आहेत. यामध्ये फेरीवाले आणि भाजीपाला विकणाऱ्यांना रोज सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत मुभा देण्यात आली आहे. तसेच या काळात रोज सकाळी 10 ते 12  दरम्यान बँकेचे व्यवहारसुद्धा सुरु राहणार आहेत.

 

जिल्ह्यात लॉकडाऊन वाढण्याची कारणे –

>> बीड जिल्ह्यामध्ये दिवसाला 28 ते 30 रुग्णांचा मृत्यू होत आहे. मृतांचं प्रमाण कमी करण्यासाठी कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे.

>> बाजारपेठेमध्ये वेळोवेळी सूचना करूनही नागरिक ऐकत नसल्यामुळे आणि सूचनांचे पालन करत नाहीत. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे.

>> जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेची तारांबळ कमी व्हावी. तसंच ज्यांना उपचाराची खरी गरज आहेत त्यांच्यावर उपचार व्हावेत यासाठी कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आलीय.

>> गेल्या महिनाभरात प्रत्येक दिवशी हजारहून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. वाढत्या रुग्णसंख्येला आळा बसावा यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय.

> बीडसह अन्य शहरात रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात आढळत होती. मात्र, आता गावखेड्यांमध्येही रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी हा निर्णय घेतला गेला आहे.

इतर बातम्या :

Maharashtra Coronavirus LIVE Update : बीड जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन, 12 मे पर्यंत फक्त अत्यावश्यक सेवांना मुभा

Weather Alert | विजांच्या कडकडाटासह सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सोलापुरात पूर्वमोसमी पावसाची हजेरी; पुढील 5 दिवस महत्त्वाचे

(district collector Ravindra Jagtap imposed Lockdown in whole Beed district all institutions hotels restaurants general stores will be closed)