Maharashtra News Update Live : आजच्या महत्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर…
आजच्या महत्वाच्या घडामोडींचे वेगवान अपडेट्स , वाचा एका क्लिकवर...
सध्या दिवाळीचा सण (Diwali 2022) सर्वत्र साजरा केला जातोय. सध्या सगळीकडे उत्साहाचं, आनंदाचं वातावरण आहे. तसंच ठिकठिकाणी दिवाळी पहाटचं आयोजन करण्यात आलं आहे. अशात काही राजकीय घडामोडीही घडत आहेत. महायुतीच्या (MNS BJP Balasahebanchi Shivsena Mahayuti) चर्चांना आता उधाण आलं आहे. लवकरच याबाबत स्पष्टता येऊ शकते. या पार्श्वभूमीवर दिवसभराचे महत्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर..
LIVE NEWS & UPDATES
-
राज्यपाल भगतसिंह कौशारी यांच्या निषेधार्थ आज लातूर बंद
लातूरमधीर बाजारपेठा बंद ठेवण्याचे शिवप्रेमींचे आवाहन
राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्याचा शिवप्रेमींकडून निषेध
-
नोव्हेंबरमध्ये समृद्धी महामार्गाचं लोकार्पण होणार
Marathi News LIVE Update
नोव्हेंबरमध्ये समृद्धी महामार्गाचं लोकार्पण होणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
नागपूर-शिर्डी मार्गाचं काम जवळपास पूर्ण
उर्वरीत महामार्गही लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार
-
-
अधिवेशनापूर्वीच मंत्रिमंडळ विस्तार होणार
Marathi News LIVE Update
अधिवेशनापूर्वीच मंत्रिमंडळ विस्तार होणार
सूत्रांची tv9 मराठीला माहिती
शिंदे गटातील 3 तर भाजपमधील 3 जणांचा होणार समावेश
महामंडळ वाटपासाठी 6 जणांची समिती गठित
-
अमरावतीच्या परतवाड्यात लक्षीपूजनाच्या दिवशी दोन गटात वाद
फटाके फोडण्यावरून दोन गटात वाद झाल्याची माहिती
दगडफेक व नारेबाजीनंतर तणावाची परिस्थिती
3 जणांना अटक, 15 हून अधिक जणांचा शोध सुरू
परिस्थिती नियंत्रणात-पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांची माहिती
-
2022 वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण सुरु
2022 वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण सुरु
भारतातही 4.17 वाजल्यापासून अडीच तास खंडग्रास सूर्यग्रहण दिसणार
2022 या वर्षीतल शेवटचं सूर्यग्रहण
इटलीमधून सर्वप्रथम सूर्यग्रहण दिसण्यास सुरुवात
गुजरातच्या भुजमध्ये सर्वाधिक काळ दिसणार ग्रहण
27 वर्षांनंतर अडीच तासाचं सूर्यग्रहण
-
-
मी कधी घाबरलो नाही
Marathi News LIVE Update
मी कधी घाबरलो नाही, भीती वाटली असती तर इथे आलो नसतो
गडचिरोली दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य
नक्षलवाद्यांना थेट संदेश देण्यासाठी मुख्यमंत्री जंगलात
जवानासोबत दिवाळी साजरी करायला आलो आहे-मुख्यमंत्री
-
दिवाळीनिमित्त फडणवीस यांची पत्रकारांशी अनौपचारीक बातचीत
दिवाळीनिमित्त फडणवीस यांची पत्रकारांशी अनौपचारीक बातचीत
मी सागर बंगल्यावर खूश, इथं खूप पॉझिटिव्हीटी- फडणवीस
‘मुख्यमंत्री शिंदे केव्हा झोपतात, हा खरंतर संशोधनाचा विषय’
राज्यमंत्री लवकर केले नाहीत तर त्रास हा होतोच- उपमुख्यमंत्री
‘डोक्यावरचे केस गेले तरच समजायचं की गृहमंत्री म्हणून चांगलं काम केलं’
मला तेव्हाच राग येतो जेव्हा मला खूप भूक लागलेली असते- फडणवीस
‘माझ्याकडे खूप सहनशीलता आहे, गेल्या 25 वर्षांत तुम्ही पाहिलंच असेल’
‘ज्या दिवाळी अंकात कुंभ राशीबद्दल चांगलं लिहिलेलं असतं, तोच दिवाळी अंक मी वाचतो’
सध्या राजकारणात कटुता वाढली आहे, हे वास्तव – देवेंद्र फडणवीस
-
तरुणांच्या दोन गटात तुफान हाणामारी
अंगावर फटाके फोडल्याच्या कारणावरून औरंगाबादेत तुफान हाणामारी
तरुणांच्या दोन गटात झाली तुफान हाणामारी
औरंगाबाद शहरातील संजय नगर मुकुंदवाडी परिसरातली घटना
मारहाण करणाऱ्या तरुणांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
अंगावर फाटक्या फोडल्याच्या कारणातून झाली बेदम मारहाण
-
व्हॉट्सअपची सेवा 2 तासानंतर पूर्ववत
Marathi News LIVE Update
व्हॉट्सअपची सेवा 2 तासानंतर पूर्ववत
तांत्रिक बिघाडामुळे काहीकाळ सेवा होती बंद
व्हॉट्सअपने ऐन दिवाळीत केला हिरमोड
शुभेच्छा संदेशासह व्हिडिओ कॉलिंगलाही वेट अँड वॉच
-
औरंगाबादमध्ये तरुणांच्या 2 गटात तुफान हाणामारी
Marathi News LIVE Update
औरंगाबादमध्ये तरुणांच्या 2 गटात तुफान हाणामारी
अंगावर फटाके फोडल्याचे कारणाने हाणामारी
लक्ष्मी पुजनाच्या दिवशी दोन गट भिडले
दोन गटातील तरुणांची एकमेकांना मारहाण
-
विदर्भातील विधानसभेच्या 44 जागा जिंकू: अतुल लोंढे
भारत जोडो यात्रेमुळे विदर्भात काँग्रेसला फायदा होईल
या यात्रेमुळे विदर्भातील 44 विधानसभा आम्ही जिंकू
विदर्भातील 8 लोकसभा जिंकण्याचा विश्वास
काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढेंचं वक्तव्य
-
वंचित आघाडीचे राधाकृष्ण विखे पाटील यांना काळे झेंडे
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या शेवगाव दौऱ्या दरम्यान काही संघटनांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
परतीचे पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागात विखे पाटलांचा दौरा
ओला दुष्काळ जाहीर करण्याची संघटनांची मागणी
तर वंचित बहुजन आघाडीचे नेते किसन चव्हाण यांच्यासह 20 ते 25 कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना दाखवणार होते काळे झेंडे
-
चक्क एकमेकांच्या अंगावर फटाके फोडून साजरी केली दिवाळी
औरंगाबादेच्या फुलंब्री तालुक्यातील वडोद बाजारात 3 गटात फटकेबाजी
चक्क एकमेकांच्या अंगावर फटाके फोडून साजरी केली दिवाळी
फटाके फोडण्याचा थरारक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल
वडोद बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटनेची तुफान चर्चा
-
एकनाथ शिंदे यांचं नाना पटोलेंना उत्तर
‘नाना पटोलेंचं विधान हास्यास्पद’, एकनाथ शिंदे यांचं विधान
दिवाळीनंतर सरकार बरखास्ताची मागणी करणार, असं पटोले म्हणाले होते.
नाना पटोले यांच्या विधानाला एकनाथ शिंदे यांचं उत्तर
-
राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ बंगल्यावर मनसैनिकांची गर्दी
दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी मनसैनिक मोठ्या संख्येनं ‘शिवतीर्थ’वर
राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ बंगल्यावर मनसैनिकांची गर्दी
-
नागपूरमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लाईव्ह
नागपूरमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लाईव्ह
अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त भागात दिवाळी साजरी करणार- मुख्यमंत्री
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नागपूरमध्ये दाखल
नक्षलवाद संपवण्यामागे पोलिसांचं मोठ योगदान- शिंदे
भामरागडमधील पोलिसांसमोर मुख्यमंत्री दिवाळी साजरी करणार
विरोधकांना कामातून उत्तर देऊ- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, निकषात बसो अथवा न बसो शेतकऱ्यांना मदत करणार- शिंदे
-
बारामतीत गोविंद बागेत उद्या दिवाळी भेट कार्यक्रम
दिवाळी भेट कार्यक्रमाची गोविंद बागेत जय्यत तयारी..
राज्यभरातील कार्यकर्ते पवार कुटुंबीयांना भेटणार..
गोविंद बागेत शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार, पार्थ पवार उपस्थित राहून स्वीकारणार शुभेच्छा
राज्यातल्या विविध भागातील कार्यकर्ते लावणार हजेरी
-
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार 27 ऑक्टोबर रोजी सोलापूर दौऱ्यावर
बार्शीतील भाजपतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले विश्वास बारबोले यांच्या दिवाळी मिलन मेळाव्याला करणार संबोधित
दिवाळी मेळाव्याच्या माध्यमातून बार्शी नगरपरिषदेच्या निवडणुकीचीही करणार साखर पेरणी
बार्शीतील माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप सोपल शिवसेनेत गेल्यानंतर शरद पवारांचा पहिलाच बार्शी दौरा
बार्शीसोबतच सांगोल्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिपक आबा साळुंखे यांचीही घेणार सांत्वनपर भेट
-
आरे कॉलनीत बिबट्याचा हल्ला, चिमुरडी ठार
मुंबई : आरे कॉलनीत बिबट्याचा हल्ला, चिमुरडी ठार
दिवाळीच्या पहाटे आरे कॉलनीत घडली दुर्दैवी घटना
16 महिन्यांच्या चिमुरडीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू
आरे कॉलनी परिसरात पुन्हा एकदा बिबट्याची दहशत
Published On - Oct 25,2022 9:52 AM