भारत बायोटेकची स्वदेशी कोव्हॅक्सिन घेण्यास ‘त्या’ डॉक्टरांचा नकार

कोव्हॅक्सिन लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या अपूर्ण असल्यामुळे या लसीच्या परिणामकारकतेबद्दल अद्याप साशंकता आहे. | Bharat Biotech covaxin

भारत बायोटेकची स्वदेशी कोव्हॅक्सिन घेण्यास 'त्या' डॉक्टरांचा नकार
Follow us
| Updated on: Jan 17, 2021 | 9:18 AM

नागपूर: राज्यभरात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर आता काही डॉक्टरांकडून स्वदेशी बनावटीची कोव्हॅक्सिन (Bharat Biotech covaxin) लस घेण्यास नकार देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी आणि नागपूरच्या शासकीय रुग्णालयातील काही डॉक्टरांनी ‘कोव्हॅक्सिन’ ही भारत बायोटेकनिर्मित स्वदेशी लस टोचून घेण्यास नकार दिला. (govt hospital health workers in Delhi refuse to take COVID-19 vaccine)

कोव्हॅक्सिन लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या अपूर्ण असल्यामुळे या लसीच्या परिणामकारकतेबद्दल अद्याप साशंकता आहे. मात्र, तरीही केंद्र सरकारने या लसीला परवानगी दिल्यामुळे वादही निर्माण झाला होता. मात्र, आता डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनीच ही लस टोचून घेण्या नकार दिल्याने पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.

नागपुरात डॉक्टर रुग्णालयातून घरी परतले

नागपूरच्या एकूण १२ पैकी मेडिकल या एकाच केंद्रावर स्वदेशी कोव्हॅक्सिन लस, तर इतर केंद्रांवर ऑक्सफर्डने विकसित केलेली आणि सीरम उत्पादित कोव्हिशील्ड लस आरोग्य कर्मचाऱ्यांना दिली जात होती. नागपूरमधील ‘मेडिकल’ या रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर आपल्याला ‘ऑक्सफर्ड’ची ‘कोव्हिशील्ड’ लस देण्यात येईल, अशा अपेक्षेने डॉक्टर तेथे पोहोचले. परंतु तेथे स्वदेशी कोव्हॅक्सिन लस दिली जात असल्याचे समजल्यावर काही डॉक्टर या केंद्रातून आल्या पावली परतले.

पुण्यात कोरोना लसीकरणाकडे निम्म्या लोकांनी फिरवली पाठ

पहिल्याच दिवशी नोंदणी केलेल्यापैकी 45 टक्के आरोग्य कर्मचारी लसीकरणाला अनुपस्थितीत राहिले. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात 800 आरोग्य सेवकांची निवड करण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात 438 जणांनी लस टोचून घेतली. 32 जणांनी रुग्णालयात आल्यावर लस टोचून घेण्यास नकार दिला. तर 330 आरोग्य सेवकांनी वेगवेगळ्या कारणांनी लसीकरणाला दांडी मारली. पुण्यात काल दिवसभरात 55 टक्के लसीकरण झाल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

लसीकरणाच्या पहिल्या दिवशी टार्गेट अपूर्ण

जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेची सुरुवात शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली. पहिल्याच दिवशी जवळपास 1 लाख 65 हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस टोचण्यात आली आहे. लसीकरणाच्या पहिल्या दिवशी टार्गेट पूर्ण करण्यात मात्र अपयश आलं आहे. लसीकरण मोहिमेला सुरुवात करण्यापूर्वी पहिल्या दिवशी 3 लाख जणांना लस देण्याचं टार्गेट ठेवण्यात आलं होतं.

संबंधित बातम्या:

Corona Vaccination | आजचा क्षण अभिमानाचा आणि आनंदाचा, कोविड टास्क फोर्सचे डॉ. संजय ओक यांची प्रतिक्रिया

प्रत्यक्ष लसीकरणास सुरुवात, पण सामान्यांचा नंबर कधी?; राजेश टोपे म्हणाले…

(govt hospital health workers in Delhi refuse to take COVID-19 vaccine)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.