पालघरच्या समुद्रात डॉल्फिन माशांची सफर; जाळ्यापासून डॉल्फिनला वाचवण्यासाठी मच्छिमारांचे प्रयत्न; खाऊसाठी केला माशांनी पाठलाग…
डॉल्फिनमुळे कोकण किनारपट्टीवर जाणाऱ्या पर्यटकांच्या संख्येतही वाढ होत आहे. समुद्रातील मच्छिमार करताना मच्छिमार करणाऱ्यांना अनेकदा डॉल्फिन माशांचे दर्शन होत असते. यावेळीही सात ते आठ माशांच्या दर्शन झाल्याने विनोद पाटील यांच्यासोबत असलेल्या साथीदारांसह दर्शन झाले तेव्हा त्यांनी माशांची काळजी घेत त्यांनी एक प्रकारे डॉल्फिन माशांना जीवदानच दिले आहे.
पालघरः पालघरमधील सातपाटी समुद्र (Palghar Satpati Sea) किनाऱ्यापासून खोल समुद्रात 30 नोटिकलच्या (Notikal) अंतरावर 7 ते 8 दुर्मिळ असलेले डॉल्फिन मासे (Dolphin) दिसून आले आहेत. सातपाटी येथील मच्छीमार विनोद पाटील आपल्या साथीदारांसह मच्छीमारीसाठी समुद्रात गेले होते, यावेळी त्यांना सात ते आठ डॉल्फिन मासे मासेमारीसाठी टाकलेल्या जाळ्याच्या जवळ येताना दिसले. मात्र हे डॉल्फिन मासेमारी जाळ्यात अडकून त्यांना दुखापत होऊ नये म्हणून विनोद पाटील आणि त्यांच्या साथीदाराने हे जाळे दूर करत डॉल्फिन माशांना जीवनदान दिलं. तसंच आपल्याजवळ असलेले खाद्यदेखील डॉल्फिन माशांना टाकलं असल्याने काही काळ हे मासे मासेमारी बोटी लगतच फिरत असल्याची माहिती विनोद पाटील आणि त्यांच्या साथीदारांनी दिली. गेल्या काही दिवसांपासून डॉल्फिन मासे कोकण किनारीपट्टीवर दिसत असल्याने कोकणामध्ये पर्यटकांचीही संख्या वाढली आहे.
पालघरमधील सातपाटी समुद्र किनाऱ्यावर डॉल्फिन माशांचे दर्शन…डॉल्फिन दिसताच मच्छिमारांनी काढून घेतले जाळे…दिले जीवदान..#konkan #Dolphin #maharashtra @tv9marathi #palgahr #sindhudurg #ratnagiri #Mumbai pic.twitter.com/gvuiRG3Aqp
— Mahadev Parvti Ramchandra (@mahadevpr) August 8, 2022
गेल्या काही वर्षांपासून कोकण किनारापट्टीवर मोठ्या प्रमाणात डॉल्फिन माशांचे दर्शन मच्छिमार करणाऱ्यांना दिसून येत आहे.
डॉल्फिन दिसताच जाळे घेतले काढून
आज मच्छिमार विनोद पाटील आपल्या साथीदारांसह मच्छिमार करण्यासाठी गेले असतानाच त्यांना सातपाटी समुद्र किनाऱ्यापासून खोल समुद्रात 30 नोटिकलच्या अंतरावर सात ते आठ डॉल्फिन मासे दिसून आले. यावेळी डॉल्फिन मासे त्यांच्या जवळ येत आहेत हे लक्षात येताच समुद्रात सोडलेले मच्छिमार करण्यासाठी सोडलेले जाळे त्यानी तात्काळ वर खेचून घेतले.
डॉल्फिनला दिले खाऊ
यावेळी त्यांच्याकडून डॉल्फिनला खाण्यासाठी काही पदार्थही टाकण्यात आले. गेल्या काही दिवसापूर्वी कोकण किनारपट्टीवर जखमी आणि मृत डॉल्फिनही सापडले होते. त्यामुळे विनोद पाटील यांच्याकडून जाळे काढून डॉल्फिन माशांची काळजी घेण्यात आली.
डॉल्फिन पाहण्यासाठी कोकणात गर्दी
डॉल्फिनमुळे कोकण किनारपट्टीवर जाणाऱ्या पर्यटकांच्या संख्येतही वाढ होत आहे. समुद्रातील मच्छिमार करताना मच्छिमार करणाऱ्यांना अनेकदा डॉल्फिन माशांचे दर्शन होत असते. यावेळीही सात ते आठ माशांच्या दर्शन झाल्याने विनोद पाटील यांच्यासोबत असलेल्या साथीदारांसह दर्शन झाले तेव्हा त्यांनी माशांची काळजी घेत त्यांनी एक प्रकारे डॉल्फिन माशांना जीवदानच दिले आहे.
पर्यटनप्रेमींकडूनही आवाहन
डॉल्फिन माशांमुळे कोकण किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात पर्यटकांची संख्या वाढत आहे. डॉल्फिन पाहण्यासाठी अनेक अभ्यासक, संशोधक आणि पर्यटनप्रेमी नेहमीच कोकण किनारपट्टीवर फेरफटका मारत असतात. डॉल्फिन माशांना वाचवण्यासाठी, ते जखमी होऊ नये यासाठीही पर्यटनप्रेमींकडून नेहमीच आवाहन केले जाते. यावेळीही विनोद पाटील या मच्छिमार करणाऱ्यानीही डॉल्फिनच दिसताच त्यांनी मासेमारीसाठी सोडण्याते आलेले जाळे काढून घेऊन डॉल्फिन माशांना एक प्रकारचे जीवदानच दिले आहे.