15 डब्ब्यांची लोकल, लेडीज स्पेशल गाड्या अन्… रविंद्र चव्हाणांनी डोंबिवली स्थानकातून फोडला प्रचाराचा नारळ, आश्वासन काय?

डोंबिवली आणि कल्याणमध्ये नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या नागरीकरणानुसार रेल्वेच्या सेवेत लवकरच सुधारणा आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या सुधारणा लवकरच अंमलात आणल्या जातील.

15 डब्ब्यांची लोकल, लेडीज स्पेशल गाड्या अन्... रविंद्र चव्हाणांनी डोंबिवली स्थानकातून फोडला प्रचाराचा नारळ, आश्वासन काय?
रविंद्र चव्हाण
Follow us
| Updated on: Oct 30, 2024 | 4:37 PM

Ravindra Chavan Election Campaigning : राज्यात विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहे. महाराष्ट्रातील 288 मतदारसंघांसाठी एकूण 7 हजार 995 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजताच राज्यातील सर्वच पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. त्यासोबतच रिंगणात उतरलेले उमेदवारही जोरदार प्रचार करताना दिसत आहेत. डोंबिवली विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार रवींद्र चव्हाण यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. रवींद्र चव्हाण यांनी आज सकाळीच रेल्वे स्थानकात जाऊन जाहीरनामा वाटप केले.

डोंबिवली विधानसभेचे उमेदवार आणि महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज सकाळी 7 वाजल्यापासून डोंबिवली रेल्वे स्थानकावर जाऊन प्रचार केला. यावेळी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह जाहीरनामा वाटप केले. यावेळी त्यांनी रेल्वे प्रवाशासोबत संवाद साधत त्यांच्या समस्यांची माहिती घेतली. यावेळी रवींद्र चव्हाण यांनी प्रवाशांना आश्वासन दिले की, डोंबिवली आणि कल्याणमध्ये नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या नागरीकरणानुसार रेल्वेच्या सेवेत लवकरच सुधारणा आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या सुधारणा लवकरच अंमलात आणल्या जातील.

लेडीज स्पेशल लोकल गाड्यांची मागणी

“रेल्वे प्रवाशांशी अनोखे नाते ही कै. रामभाऊ म्हाळगी आणि कै. रामभाऊ कापसे यांची परंपरा आहे. मी ती परंपरा जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे. मी रेल्वे प्रवासातील अडचणी जाणून घेण्यासाठी त्यावर नियमित चर्चा करेन. तसेच गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि अधिक सुलभ प्रवास सुनिश्चित करण्यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा केली. यामध्ये 15 डब्यांच्या लोकल गाड्या, विशेषतः महिला प्रवाशांसाठी लेडीज स्पेशल लोकल गाड्यांची मागणी केली आहे. सध्या शहराच्या नागरिकरणाचा वेग लक्षात घेता लवकरच यासंदर्भात सकारात्मक बदल दिसून येतील,” असे आश्वासन रविंद्र चव्हाण यांनी दिले.

हे सुद्धा वाचा

कोण मारणार बाजी?

दरम्यान डोंबिवली विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला आहे. रविंद्र चव्हाण हे सलग तीन वेळा या मतदारसंघातून सर्वाधिक मताधिक्याने निवडून आले आहेत. या मतदारसंघात बहुभाषिक लोक राहत असल्याने त्यांचे एकगठ्ठा मतदान हे भाजपला होत आले आहे. या किल्ल्याला सुरुंग लावण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाने कंबर कसली आहे. त्यासोबत मनसेही या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. त्यामुळं यंदा या मतदारसंघात कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.