आई बेपत्ता आणि दोन चिमुरडे भर पाण्यात, काळजाचा ठोका चुकवणारी घटना

डोंबिवलीच्या खाडीतील पाण्याच्या मधोमध असलेल्या टापूवर दोन चिमुकले अडकून पडले होते.

आई बेपत्ता आणि दोन चिमुरडे भर पाण्यात, काळजाचा ठोका चुकवणारी घटना
Follow us
| Updated on: Dec 08, 2020 | 9:32 AM

डोंबिवली : डोंबिवलीत एक मन हेलावून टाकणारी धक्कादायक घटना घडली आहे (Dombivali Children Stuck In The Middle Of Water). डोंबिवलीच्या खाडीतील पाण्याच्या मधोमध असलेल्या टापूवर दोन चिमुकले अडकून पडले होते. दोन तरुणांनी मोठ्या हिमतीने पाण्यातून वाट काढत या चिमुकल्यांना वाचवलं आहे. या मुलांच्या आईने आत्महत्या केली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे (Dombivali Children Stuck In The Middle Of Water).

डोंबिवलीच्या खाडीतील पाण्याच्या मधोमध असलेल्या टापूवर दोन चिमुकले रडत होते. चारही बाजूने पाण्याने वेढलेल्या या टापूवर त्या लहानग्यांना बघून ग्रामस्थ हैराण झाले. त्यांना कसं वाचवावं याचाच सर्वजण विचार करत होते. यादरम्यान, या मुलांना वाचवण्यासाठी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता कचोरे गावातील ग्रामस्थांपैकी दोन तरुण गणेश मुकादम आणि तेजस मुकादम हे खाडीच्या पाण्यात उतरले. त्या दोन मुलांना पाण्यातून बाहेर काढले. या दोन तरुणांमुळे त्या लहानग्यांचे जीव वाचले.

जर या तरुणांनी धाडस दाखवलं नसतं तर कदाचित या मुलांचा जीव वाचला नसता. कारण, अंधार झाल्यानंतर खाडीतील पाण्याच्या पातळीत वाढ झाली असती आणि हे चिमुरडे पाण्यात बुडाले असते. मात्र, गणेश मुकादम आणि तेजस मुकादम या दोन तरुणांच्या धाडसाने या चिमुकल्यांना जीवनदान मिळाले आहे. त्यासाठी त्यांचं कौतुक केलं जात आहे.

या चिमुकल्यांपैकी एक मुलगा दोन वर्षांचा आहे, तर दुसरा सहा महिन्यांचा आहे. या दोन्ही मुलांना विष्णूनगर पोलिसांना सुपूर्द करण्यात आले आहे.

विष्णूनगरचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक संजय साबळे यांनी सांगितले की, या मुलांटी आई त्यांना घेऊन खाडीजवळ आली असण्याची शक्यता आहे. तिचा शोध सुरु आहे. ती कुठे आहे ते कोणालाच माहिती नाही. तपास सुरु आहे. मात्र, लहान मुलांना सोडून आईने आत्महत्या केली असल्याची शक्यता आहे.

Dombivali Children Stuck In The Middle Of Water

संबंधित बातम्या :

बाप नव्हे सैतान! गुप्तांगावर मेणाचे चटके, अमानुष मारहाण, सहा वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या सावत्र बापाला अटक

दीड महिन्याच्या बाळाचे अपहरण, मृतदेह विहिरीत आढळल्याने खळबळ

फुटपाथवर झोपलेल्या कुटुंबातील बाळाची चोरी; अवघ्या चार तासात चौघांना अटक

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.