ठाकरे गटाला डोंबिवलीत मोठा धक्का, निष्ठावंत शिवसैनिकाचे रवींद्र चव्हाणांना निवडून देण्याचे आवाहन, केवळ मनी पॉवर…

ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख असलेल्या सदानंद थरवळ यांनी राजीनामा दिला होता. दिपेश म्हात्रेनना उमेदवारी मिळाल्याने थरवळ अस्वस्थ होते. त्यांनी आता एका पत्रातून रोष व्यक्त केला असून भाजपच्या उमेदवाराला निवडून देण्याचे आवाहन केलं आहे.

ठाकरे गटाला डोंबिवलीत मोठा धक्का, निष्ठावंत शिवसैनिकाचे रवींद्र चव्हाणांना निवडून देण्याचे आवाहन, केवळ मनी पॉवर...
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Nov 18, 2024 | 8:24 AM

विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे 2 दिवस उरलेले असून आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. सर्वच पक्षांनी आज सभा, दौऱ्यांचा धडाका लावला असून आज संध्याकाळी प्रचार संपुष्टात येईल. विआतर्फेही सभा, दौऱ्यांचे आयोजन करण्यात आले आहे, मात्र निवडणुकीपूर्वीच मविआतील एक महत्वाचा पक्ष असलेल्या ठाकरे गटाला ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) मोठा धक्का बसला आहे. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी शिंदे शिवसेनेचे दीपेश म्हात्रे यांना आयत्यावेळी पक्षात घेऊन डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिल्याने डोंबिवलीत एकच खळबळ माजली होती. यामुळ नाराज झालेले ज्येष्ठ शिवसैनिक सदानंद थरवळ यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख पद आणि शिवसेना सदस्यत्वाचा काही महिन्यांपूर्वी राजीनामा दिला होता. निष्ठावान, पक्षाशी एकनिष्ठ राहणाऱ्या शिवसैनिकांवर वेळोवेळी अन्याय करून, आयात उमेदवारांवर विश्वास दाखवून त्यांना उमेदवाऱ्या देण्यात येत असतील तर निष्ठावान शिवसैनिकांनी करायचे काय, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी पक्षाला रामराम केला होता.

काल शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी होती. त्याच पार्श्वभूमीवर सदानंद थरवळ यांनी रात्री सोशल मीडियावर एक पत्र शेअर केले. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावे हे पत्र लिहीत सदानंद थरवळ यांनी मनातील खदखद व्यक्त केली आहे. तसेच त्यांनी भाजपा समर्थन देण्यासाठी हे खुलं पत्र ट्विटरच्या माध्यमातून लिहीलं आहे. त्यांच्या या पत्राने मोठी खळबळ माजली आहे.

ठाकरेंच्या ऊमेदवाराविरोधात सदानंद थरवळ मैदानात

2024 च्या निवडणुकीसाठी विधानसभा मतदारसंघात दीपेश म्हात्रे यांना ठाकरेंच्या शिवसेनेने पहिल्या यादीत उमेदवारी जाहीर केल्याने ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख असलेल्या सदानंद थरवळ यांनी राजीनामा दिला होता. दिपेश म्हात्रेनना उमेदवारी मिळाल्याने थरवळ अस्वस्थ होते आणि त्यांनी राजीनाम्याचे पाऊल उचललं. आता निवडणुकीसाठी मतदान करण्यासाठी अवघे 2 दिवस असताना आता हे खुलं पत्र लिहीत थरवळ यांनी ठाकरेंवर आरोप केले आहेत. तसेच भाजपचे डोंबिवलीतील उमेदवार रविंद्र चव्हाण यांना निवडून देण्याचे आवाहन केले आहे. नव्या तरूणांना संधी दिली पण निष्ठावंतांना डावललं असा आरोपी थरवळ यांनी ठाकरे गटावर केला आहे.

सदैव स्वार्थातच मश्गुल..

माझी कर्मभूमी असलेली आपली डोंबिवली ही एक सुसंस्कृत शहर म्हणून प्रसिद्ध आहे. मी पाहिलेल्या गेल्या पाच दशकांमध्ये डोंबिवलीकरांनी नेहमीच वैचारिकदृष्ट्या शिवसेना-भाजप युतीला साथ दिली. या युतीचा भाग असलेल्या शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून आम्हास भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवका संघाबरोबर जवळून काम करण्याची संधि मिळाली. आणि लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून अनेक विकासकामेही करता आली. या निवडणुकीमध्ये डोंबिवलीची सांस्कृतिक प्रतिमा जपणारा आणि विकासासाठी निधी आणू शकणाराच उमेदवार जनता निवडून देईल. जो उमेदवार स्वत:च्या विचराधारेशी एकनिष्ठ असतो, तोच जनतेशी प्रामाणिक राहू शकतो, आणि सोयीनुसार 3-4 वेळा विचारधारा बदलणारे सदैव स्वार्थातच मश्गुल असतात. त्यामुळे डोंबिवलीत सध्या उभ्या असलेल्या उमेदवारांपैकी श्री. रविंद्र चव्हाण यांनाच निवडून देणे डोंबिवलीच्या विकासाच्या दृष्टीने अधिक हितावह आहे.

साहेब, म्हणूनच तुमच्या विचारांचा वारसा चालवणाऱ्यांनाच आमचा पाठिबा राहील, असे सदानंद थरवळ यांनी आपल्या पत्रात नमूद केलं आहे.

सदानंद थरवळ यांचं पत्र 

Non Stop LIVE Update
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर....
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर.....
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?.
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्.
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार.
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं.
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य.
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप.
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट.
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?.
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?.