Thane Water Crisis : डोंबिवलीत तब्बल 52 तास नाही पाणी! पाण्यासाठी डोंबिवलीकरांची एमआयडीसी कार्यालयावर धडक

नव्याने उभ्या राहणाऱ्या गृहसंकुलन तसेच टँकर माफियांना मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा होत असताना रहिवासी भागावर हा अन्याय का? असा सवाल यावेळी अधिकाऱ्यांना विचारण्यात आला. येत्या काळात हीच परिस्थिती राहिली, तर मात्र तीव्र आंदोलन करण्याचा इशारा डोंबिवलीकरांनी यावेळी दिला.

Thane Water Crisis : डोंबिवलीत तब्बल 52 तास नाही पाणी! पाण्यासाठी डोंबिवलीकरांची एमआयडीसी कार्यालयावर धडक
पाऊस उशिरा आला तरी मुंबईकरांना पाण्याची चिंता नाही, जाणून किती शिल्लक आहे पाणीसाठा Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 30, 2022 | 4:48 PM

डोंबिवली : आता राज्यातील महापालिकांच्या निवडणूका (Municipal Elections) होण्याची शक्यता आहे. त्यातच आता डोंबिवलीतील रहिवाशांना तब्बल 52 तास पाण्याविना रहावे लागल्याचे समोर आले आहे. तर पाणी नसल्याने डोंबिवलीकर हैराण झाले होते. त्यामुळे पाणीपुरवठा खंडित झालेल्या डोंबिवलीकरांनी (Dombivali Residents)आज एमआयडीसीच्या कार्यालयावर धडक मारली. तसेच यावेळी एमआयडीसीच्या अभियंत्यांना खंडित झालेल्या पाणीपुरवठ्याबाबत डोंबिवलीकरांनी चांगलंच धारेवर धरलं. त्यावेळी अंबरनाथ शहरातून येणारी जलवाहिनी (Water Canal) फुटल्यानं शटडाऊननंतर पुन्हा आणखी काही तास पाण्यावाचून डोंबिवलीकरांना काढावे लागले, असं स्पष्टीकरण एमआयडीसी अधिकाऱ्यांनी दिलं.

एमआयडीसीकडून पाणी पुरवठा 

डोंबिवली एमआयडीसीतील रहिवासी भागाला एमआयडीसीकडून पाणी पुरवठा होतो. शुक्रवारी या परिसरात एमआयडीसीकडून 24 तासांचा शटडाऊन घेण्यात आला होता. मात्र त्यानंतर 52 तास पाणीपुरवठा बंदच राहिल्याने डोंबिवलीकरांचे प्रचंड हाल झाले. अंबरनाथ शहरातून येणारी जलवाहिनी फुटल्यानं शटडाऊननंतर पुन्हा आणखी काही तास पाण्यावाचून डोंबिवलीकरांना काढावे लागले, असं स्पष्टीकरण एमआयडीसी अधिकाऱ्यांनी दिलं.

तीव्र आंदोलन करण्याचा इशारा

डोंबिवली एमआयडीसी या भागात वारंवार पाणीपुरवठा खंडित आणि कमी दाबाने होत असल्यानं आज डोंबिवलीकरांनी एमआयडीसी कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना जाब विचारला. नव्याने उभ्या राहणाऱ्या गृहसंकुलन तसेच टँकर माफियांना मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा होत असताना रहिवासी भागावर हा अन्याय का? असा सवाल यावेळी अधिकाऱ्यांना विचारण्यात आला. येत्या काळात हीच परिस्थिती राहिली, तर मात्र तीव्र आंदोलन करण्याचा इशारा डोंबिवलीकरांनी यावेळी दिला.

हे सुद्धा वाचा

पाणी पुरवठ्यावर त्याचा परिणाम

सध्या पाणीपुरवठा सुरळीत झाला असून शटडाऊनची माहिती नागरिकांना देण्यात आली होती. मात्र काम झाल्यावर अचानक जलवाहिनी फुटल्यानं आणखी काही तास पाणी पुरवठ्यावर त्याचा परिणाम झाला आहे.

– विजय धामापूरकर, एमआयडीसी अभियंता

ही टंचाई कधी संपणार?

डोंबिवली एमआयडीसी परिसर आणि ग्रामीण भागात मागील काही दिवसांपासून पाण्याची मोठी टंचाई भासतेय. याच भागात खदानीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या 5 जणांचा मृत्यूही झाला होता. त्यामुळं ही टंचाई कधी संपणार? असा प्रश्न आता विचारला जातोय.

– निनाद करमरकर, डोंबिवली

Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?.
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका.
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी.
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.