Dombivli Election Result 2024 : डोंबिवलीत कमळ पुन्हा फुलले की मशाल पेटली ? रवींद्र चव्हाण की दीपेश म्हात्रे, कोण विजयी ? अखेर निकाल समोर

Dombivali Assembly election : 2009 पासून डोंबिवली हा भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. गेल्या तीन वेळेस निवडून येत भाजपच्या रवींद्र चव्हाणांनी हॅटट्रिक केली. यंदाही ते विजयी पताक फडकावतील की दीपेश म्हात्रे त्यांची विजयी घोडदौड रोखतील याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर डोंबिवलीचा निकाल समोर आला आहे.

Dombivli Election Result 2024 : डोंबिवलीत कमळ पुन्हा फुलले की मशाल पेटली ? रवींद्र चव्हाण की दीपेश म्हात्रे, कोण विजयी ? अखेर निकाल समोर
डोंबिवलीत रवींद्र चव्हाण की दीपेश म्हात्रे, कोण विजयी ?
Follow us
| Updated on: Nov 23, 2024 | 1:29 AM

2008 साली कल्याण विधानसभा मतदारसंघाचं विभाजन झाल्यानंतर डोंबिवली हा नवा , स्वतंत्र मतदारसंघ झाला. त्यानंतर पुढल्या वर्षीच झालेल्या विधानसभ निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या रवींद्र चव्हाणांनी विजयाचा गुलाल उधळला आणि तेव्हापासूनच डोंबिवली हा भाजपचा बालेकिल्ला बनलां. त्यानंतर सलग तीन वेळा रवींद्र चव्हाण यांनी निवडणूक लढवली आणि जिंकलीदेखील. यंदा त्यांच्यासमोर आव्हान होते ते महाविकास आघाडीतून उमेदवारी मिळालेल्या शिवसेनेच्या दीपेश म्हात्रे यांचं. या दोघांमध्ये काटे की टक्कर झाली. मात्र 20 तारखेला केलेल्या मतादानात डोंबिवलीकरांनी मतदान केलं आणि त्यांनी कोणाला कौल दिलाय हे अखेर आज स्पष्ट झालं आहे. डोंबिवलीचा निकाल समोर आला आहे.

डोंबिवलीत भाजपचे रवींद्र चव्हाण वि. शिवसेना उबाठा गटाचे दीपेश म्हात्रे यांच्यात प्रमुख लढत होती. मात्र निवडणुकीपूर्वीच ठाकरे गटाला ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) मोठा धक्का बसला. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी शिंदे शिवसेनेचे दीपेश म्हात्रे यांना आयत्यावेळी पक्षात घेऊन डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिल्याने डोंबिवलीत एकच खळबळ माजली होती. यामुळ नाराज झालेले ज्येष्ठ शिवसैनिक सदानंद थरवळ यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख पद आणि शिवसेना सदस्यत्वाचा काही महिन्यांपूर्वी राजीनामा दिला होता. त्यानंतर मतदानाच्या 2 -3 दिवस आधीच त्यांनी 17 नोव्हेंबरला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीच्या िवशी एक जाहीर पत्र लिहून मनातील खदखद व्यक्त केली. तसेच भाजपाच्या रवींद्र चव्हाण यांना खुल समर्थन दिल्याचंही त्यातून स्पष्ट केलं. यामुळे दीपेश म्हात्रे यांची लढाई कठीण बनली.

डोंबिवलीतील समस्या

डोंबिवली विधानसभा मतदारसंघात कापसे प्रशासकीय इमारतीसह विविध समस्या आहेत. तसेच डोंबिवली पूर्वेकडील असुरक्षित KDMC इमारतीचा पुनर्विकासाचा मुद्दाही बराच चर्चेत होता. तसेच केडीएसमी मनपाकडून सर्व अत्यावश्यक सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वाची पाऊल उचलण्याची मागणीही करण्यात येत होती. या सर्व पार्श्वभूमीवर आता डोंबिवलीकरांनी कोणाला मतदान केलं, निवडून दिलं हे या निकालाने स्पष्ट झालं आहे.

डोंबिवली विधानसभा निवडणूक 2019 चा निकाल

2019 मध्ये भाजपचे रवींद्र चव्हाण हे 86,227 मतं मिळवून विजयी झाले होते. तर मनसेचे श्रीकांत हळबे हे 44,916 मतं मिळवून दुसऱ्या स्थानी होते. २०१९ मध्ये भाजप, काँग्रेस आणि मनसे अशी तिहेरी लढत झाली होती. रवींद्र चव्हाण हे देवेंद्र फडणवीस यांचं अत्यंत जवळचे सहकारी आहेत. राज्याच्या मंत्रिमंडळात ते मंत्री देखील आहेत.

डोंबिवली कागल विधानसभा निवडणूक निकाल 2024

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024 LIVE Counting

विधानसभा निवडणूक निकाल 2024 LIVE

महाराष्ट्र विधानसभा इलेक्शन रिझल्ट 2024 LIVE Updates

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024 LIVE Coverage

Non Stop LIVE Update
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्...
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्....
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य.
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात..
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात...
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान.
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?.
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले..
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले...
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप.
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?.
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा.
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?.