Dombivli MIDC Blast : डोंबिवली MIDC दुर्घटनाप्रकरणी कंपनीच्या मालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

डोंबिवलीतील ‘एमआयडीसी’येथील ‘अमुदान’ या रसायन कंपनीत गुरुवारी दुपारी बॉयलरचा भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत आत्तापर्यंत 11जणांचा मृत्यू झाला असून 65 हून अधिक कामगार गंभीर रित्या जखमी झाले. अमुदान या कंपनीच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Dombivli MIDC Blast : डोंबिवली MIDC दुर्घटनाप्रकरणी कंपनीच्या मालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
Follow us
| Updated on: May 24, 2024 | 8:54 AM

डोंबिवलीतील ‘एमआयडीसी’येथील ‘अमुदान’ या रसायन कंपनीत गुरुवारी दुपारी बॉयलरचा भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत आत्तापर्यंत 11जणांचा मृत्यू झाला असून 65 हून अधिक कामगार गंभीर रित्या जखमी झाले आहेत. काल रात्री उशीरापर्यंत एनडीआरएफच्या टीमकडून येथे शोधमोहिम राबवण्यात येत होती. आज, शुक्रवारी सकाळी पुन्हा बचावकार्य सुरू करण्यात आले असून ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान या दुर्घटनेप्रकरणी आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे ती म्हणजे अमुदान या कंपनीच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालती प्रदीप मेहता आणि मलय प्रदीप मेहता यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल दुपारी झालेल्या बॉयलरच्या स्फोटामुळे भीषण आग लागून दुर्घटना घडली.

NDRF च्या टीमकडून शोधमोहिम सुरू

NDRF च्या टीमकडून शुक्रवार सकाळापासून पुन्हा शोधमोहिम सुरू करण्यात आली. पाच गाड्या तेथे दाखल झाल्या असून रेस्क्यू ऑपरेशन सुरू झाले आहे. या दुर्घटनेत आत्तापर्यंत ११ जणांना जीव गमवावा लागला आहे. काल रात्रीपर्यंतचा आकडा हा ८ होता मात्र आज सकाळपासून आणखी तीन मृतदेह दुर्घटनास्थळी असलेल्या ढिगाऱ्याखालून काढण्यात आले आहेत. त्यामुळे मृतांची संख्या आता ११ वर पोहोचली असून आणखी बरेच ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता असून मृतांचा आकडा वाढण्याची भीतीही व्यक्त होत आहे.

काल दुपारच्या सुमारास झालेला हा स्फोट इतका भीषण होता की कंपनीच्या आसपासच्या परिसरातील अनेक बिल्डींगमधील घरांच्या काचा फुटल्या.तर काही ठिकाणी ग्रीलही दुभंगले. घरात काचांचा सडा पडल्याने अनेक जण जखमीही झाले. या स्फोटामुळे भीषण आग लागली होती, आगीचे लोळ एवढे मोठे होते की दोन किलोमीटर लांबूनही त्याची दृश्य दिसत होती, तीव्रता जाणवत होती. अखेर अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले.

परिसरात पसरली दुर्गंधी

या घटनेमुळे परिसरातील इमारती, घरे आणि दुकानांचं नुकसान झालं आहे. जखमींमध्ये परिसरातील स्थानिकांचा देखील समावेश असल्याची माहिती मिळत आहे. स्फोटानंतर परिसरात एका बालरुग्णालयाचं काचेचं गेटचा चक्काचूर झाला. रुग्णालयाबाहेर काचेचा खच पडला आहे.

दरम्यान हा स्फोट जिथे झाला, त्या आसपासच्या परिसरात आता तीव्र दुर्गंधी पसरली आहे. या केमिकल कंपनीतील रसायनांमुळे ही दुर्गंधी पसरली असून त्यामुळे तेथील रहिवाशांना बराच मनस्ताप सहन करावा लागत आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.