Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दुकानांतून खरेदी करू नका, मुस्लिम चालकांच्या रिक्षात बसू नका, RSS शाखेवरील दगडफेकीनंतर कार्यकर्ते आक्रमक

डोंबिवलीत काही दिवसांपूर्वी 90 फीट रोडवरील एका मैदानावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) शिबीर सुरू होते. काही अज्ञात लोकांनी त्या प्रशिक्षण शिबीरावर गेल्या आठवड्यात दगडफेक केली आणि हे प्रकरण प्रचंड तापलं.

दुकानांतून खरेदी करू नका, मुस्लिम चालकांच्या रिक्षात बसू नका, RSS शाखेवरील दगडफेकीनंतर कार्यकर्ते आक्रमक
RSS शाखेवरील दगडफेकीनंतर कार्यकर्ते आक्रमकImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 17, 2025 | 2:03 PM

डोंबिवलीत काही दिवसांपूर्वी 90 फीट रोडवरील एका मैदानावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) शिबीर सुरू होते. काही अज्ञात लोकांनी त्या प्रशिक्षण शिबीरावर गेल्या आठवड्यात दगडफेक केली आणि हे प्रकरण प्रचंड तापलं. याप्रकरणी कचोरे संघ शाखा चालकाच्या पुढाकारातून टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. आता या दगडफेकीप्रकरणी एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. डोंबिवलीमधील अप्पा दातार चौकात आरएसएसच्या कार्यकर्त्यांची सभा झाली. शाखेवरील दगडफेक प्रकरणानंतर हे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत.

या सभेत मुस्लिमांवर आर्थिक बहिष्कार टाकण्याचे आवाहन करण्यात आलं. दुकानांमधून काही खरेदी करुन नका, मुस्लिम रिक्षा चालकाच्या रिक्षात बसू नका असे आवाहन करण्यात आलं. दोन दिवसा पूर्वीचा सभेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

शहर म्हणून आपण मुसलमान दुकानदारांवर आर्थिक बहिष्कार टाकणार आहोत. कुठल्याही दुकानात गेल्यावर दुकानाच्या मालकाचं नाव विचारा, नाव सांगितल नाही तर त्या दुकानाचा फोटो आपण डोंबिवलीतील सर्व व्हॉट्सॲप ग्ररुपवर टाकणार आहोत. आणि त्या दुकानाशी व्यवहार पूर्णपणे बंद करणार आहोत. रिक्षाचा मालक हिंदू असला आणि चालक मुस्लिम असला तरीही त्या रिक्षात बसायचं नाही,भलेही चार-पाच किलोमीटर अंतर चालत जावं लागलं तरी चालेल. दुकानांमधून काही खरेदी करुन नका, मुस्लिम रिक्षा चालकाच्या रिक्षात बसू नका असे आवाहन करण्यात आलं आहे.

काय आहे प्रकरण ?

डोंबिवलीतील ठाकुर्ली ९० फुटी रस्त्यावरील कचोरे गाव येथील वीर सावरकर नगर येथील एका मैदानावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे 35 बालकांचे विविध खेळ स्पर्धांचे प्रशिक्षण शिबीर महिनाभरापासून घेतले जाते. या प्रशिक्षण शिबिरावर गेल्या आठवड्यात रविवारी रात्री आठ वाजता अज्ञात इसमांनी दगडफेक केली. मागील महिनाभरापासून कचोरेतील वीर सावरकर नगर भागात चौधरी वाडी मैदानात संघ स्वयंसेवकांना प्रशिक्षण देण्याचा उपक्रम सुरू आहे. यापूर्वी एक, दोन वेळा हा प्रशिक्षण कार्यक्रम सुरू असताना अज्ञाताने दगडफेक केली होती. चुकून दगड आले असावेत म्हणून त्याकडे चालकांनी दुर्लक्ष केले.

पण रविवारी रात्री पुन्हा अचानक चौधरी वाडी मैदान भागातील झाडाझुडपांमधून प्रशिक्षण घेत असलेल्या मुलांच्या दिशेने दगड भिरकावण्यात आले. सुरुवातीला चुकून ह दगड कोणी फेकला असल्याचा संशय चालकांना आला. त्यानंतर दगड फेकण्याचे प्रमाण वाढल्याने हा  मुद्दाम त्रास देण्याच्या उद्देशाने हा प्रकार केला जात असल्याचं स्पष्ट झालं. शाखेजवळच्या जंगलातून अंधाराचा फायदा घेऊन दगडफेक करण्यात आली. परिसरातील काही इमारतींमध्ये लपलेल्या अज्ञातांनीही दगडफेक केली. शाखा सुरू असताना दगडफेक झाली. पण मुलांनी आवश्यक ती खबरदारी घेतल्यामुळे कोणी जखमी झाले नाही. शाखेवर झालेल्या दगडफेकीनंतर संघाच्या आणि भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी दगडफेक प्रकरणी गुन्हा नोंदवला. दगडफेक प्रकरणात पाच आरोपींना टिळकनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यातील चार आरोपी अल्पवयीन असल्याचं समजतं.

जळगावात दोन गटात तूफान राडा
जळगावात दोन गटात तूफान राडा.
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख.
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला.
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया.
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय...
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय....
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?.
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली...
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली....
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी.
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'.
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन.