Kolhapur News : कोल्हापूरात भटक्या जनावरांच्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये भीती, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

| Updated on: Jul 08, 2023 | 8:47 AM

महाराष्ट्रात सध्या अनेक जिल्ह्यातील शहरात भटक्या प्राण्यांची दहशत असल्याचं पाहायला मिळत आहे. वारंवार तक्रार करुनही पालिकेकडून कसल्याची प्रकारची कारवाई होत नाही.

Kolhapur News : कोल्हापूरात भटक्या जनावरांच्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये भीती, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
गाढवाचा हल्ला
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

कोल्हापूर : कोल्हापूरात (kolahapur news) भटक्या प्राण्यांची (kolhapur animal news) दहशत असल्याची सगळीकडं चर्चा सुरु आहे. एका गाढवाने तीन जणांना जखमी केल्यानंतर भटक्या प्राण्यांच्या प्रश्नाने पुन्हा डोकेवर काढले आहे. विशेष म्हणजे मागच्या कित्येक दिवसांपासून कोल्हापूरकर पालिकेच्या अधिकाऱ्यांना वारंवार तक्रार देऊनही कसल्याची प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही. कुत्र्यांनी सुध्दा अनेकदा तिथल्या नागरिकांना चावा घेतला आहे. त्याची सुध्दा अनेकदा तक्रार केली आहे. परंतु पालिकेकडून कारवाई होत नसल्यामुळे अशा प्रकारचे हल्ले होत असा आरोत तिथले नागरिक करीत आहेत. गाढवाने जो हल्ला केला, त्याचा व्हिडीओ सीसीटिव्हीत कैद (cctv video) झाला आहे.

भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात तेरा जण जखमी

कोल्हापूरच्या गांधीनगर मध्ये भटक्या गाढवांची दहशत आहे. त्या परिसरात अधिक गाढवं असल्यामुळे लोकं त्यांना पाहून घाबरत आहेत. गाढवांनी आतापर्यंत अनेकांवरती हल्ला केल्याचं नागरिक सांगत आहेत. काल गाढवाने केलेल्या हल्ल्यात वृद्धासह तिघेजण जखमी झाले आहेत. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सीसीटिव्हीत कैद झाला आहे. सीसीटिव्हीतील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे नागरिका भीतीच्या सावटाखाली आहेत. मागच्या काही दिवसांपूर्वी कोल्हापूरात भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात तेरा जण जखमी झाले होते. त्यानंतर पालिकेच्या अधिकाऱ्यांना भटक्या प्राण्यांचा बंदोबस्त करावा असं सांगण्यात आलं होतं.

हे सुद्धा वाचा

महाराष्ट्रात सध्या अनेक जिल्ह्यातील शहरात भटक्या प्राण्यांची दहशत असल्याचं पाहायला मिळत आहे. वारंवार तक्रार करुनही पालिकेकडून कसल्याची प्रकारची कारवाई होत नाही.  भटकी कुत्री, गाढवं आणि गाई त्याचबरोबर डुकरं अनेकदा लोकांना त्रास देत आहेत. त्याचबरोबर अचानक हल्ला करीत आहेत.