गाढव, कोंबडी चोर आणि कडकनाथ कोंबडी चोर, मराठा आंदोलकांनी ‘या’ नेत्यांना चपलेने झोडले

सांगली जिल्ह्यातील विटा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा समाजाच्या आंदोलकांनी आंदोलन केले. यावेळी मराठा समाजाचा अपमान करणाऱ्या आणि त्याविरोधात बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांचा निषेध केला. मराठा कृती समितीचे प्रमुख शंकर मोहिते यांनी समर्थन दिले आहे.

गाढव, कोंबडी चोर आणि कडकनाथ कोंबडी चोर, मराठा आंदोलकांनी 'या' नेत्यांना चपलेने झोडले
MANOJ JARANGE PATILImage Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Nov 01, 2023 | 9:03 PM

सांगली | 1 नोव्हेंबर 2023 : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात विविध जिल्ह्यात आंदोलन होत आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक गावांनी नेत्यांना गावबंदी केलीय. तर, काही ठिकाणी आमदार, नेते यांचे बंगले आंदोलकांनी पेटवले. एकूणच शांततेने सुरु असलेल्या या आंदोलनाने आता हिंसक वळण घेतले आहेत. मराठा आंदोलक आता राज्यकर्त्यांविरोधात रोष व्यक्त करत आहेत. सांगलीमध्ये या आंदोलनाचे पडसाद उमटले आहेत.

मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी सांगलीतील विटा येथे साखळी उपोषण सुरु आहे. या उपोषणाचा तिसरा दिवस सुरु आहे. उपोषण करणारे आंदोलक बुधवारी चांगलेच आक्रमक झाले. विटा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलकांनी मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या तसेच मराठा समाजाबद्दल बैताल वक्तव्य करणारे अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या पुतळ्याला चप्पलने झोडपले.

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले. त्यांना मराठा कृती समितीचे प्रमुख शंकर मोहिते यांनी समर्थन दिले आहे. शंकर मोहिते यांच्या नेतृत्वाखाली विटा येथे सोमवारपासून साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. आंदोलनाच्या आजच्या तिसऱ्या दिवशी आंदोलकांनी एक रावणरुपी पुतळा बनविला होता.

हे सुद्धा वाचा

मराठा आरक्षणाला विरोध करणारे अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते, मराठा समाजाबद्दल अपशब्द वापरणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे, महायुतीचे मंत्री छगन भुजबळ, रयत क्रांतीचे माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, शिवसेना (शिंदे गट) नेते रामदास कदम यांचे फोटो या रावणरूपी प्रतिकात्मक पुतळ्यावर लावण्यात आले होते.

आंदोलकांनी आधी या पुतळ्याची अंत्यरात्रा काढली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्या प्रतिकात्मक पुतळ्याला चप्पलने झोडपले आणि नंतर त्या पुतळ्याचे दहन केले. यावेळी संतप्त आंदोलकांनी सदावर्ते यांचा उल्लेख गाढव, नारायण राणे यांचा उल्लेख कोंबडी चोर आणि सदाभाऊ खोत यांचा उल्लेख कडकनाथ कोंबडी चोर असा केला. यावेळी आंदोलकांनी या सर्व नेत्यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.

Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.