गडचिरोलीच्या ‘या’ वस्तूला थेट अयोध्या राममंदिर उभारणीत मानाचं स्थान

कोट्यावधी रामभक्तांचे स्वप्नातील मंदिर मूर्त रूपात येत असताना त्यासाठी लागणारे लाकूड आलापल्ली येथून जावे हे देखील गडचिरोलीकरांसाठी भाग्याचे ठरले असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

गडचिरोलीच्या 'या' वस्तूला थेट अयोध्या राममंदिर उभारणीत मानाचं स्थान
Follow us
| Updated on: Mar 25, 2023 | 10:52 PM

गडचिरोली : देशातील निवडणुका तोंडावर आल्या की, राम मंदिराचा विषय उफाळून वर आलेला असतो. मात्र 2014 पासून भाजप सत्तेत आल्यानंतर वारंवार अयोध्येच्या राम मंदिराचा विषय कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेला आलेला असतो. आता महाराष्ट्रासाठी राम मंदिरही वेगळ्याच गोष्टीमुळे अधिक चर्चेत आले आहे. कारण जे राम मंदिर उभारलं गेलं आहे, त्या राम मंदिरासाठी आता महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातून महत्वाचा ऐवज जात आहे. त्यामुळे अयोध्येच्या राममंदिराला आता महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्याची जोड मिळणार आहे.कारण राममंदिरासाठी देशभरातून वेगवेगळ्या ठिकाणाहून साहित्यांची मागणी करण्यात आली होती.

राम मंदिरासाठी जे तज्ज्ञ म्हणून काम करत आहेत. त्यांनी राम मंदिराच्या द्वार तयार करण्यासाठी देशातील अनेक ठिकाणाहून वेगवेगळ्या प्रकारचे लाकूड मागण्यात आले होते. त्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातून सागवान लाकूड पाठवण्यात आले होते.

आता तेच गडचिरोली जिल्ह्यातून सर्वोत्कृष्ट असणारे सागवानचे लाकूड वापरले जाणार आहे. अयोध्येच्या राममंदिराला गडचिरोली जिल्ह्याचा हातभार लागल्याने राम भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

Sagwan

हा फोटो संग्रहित आहे.

अयोध्येतील राम मंदिरासाठी गडचिरोली जिल्ह्यातील सर्वोत्तम सागवान लाकूड वापरले जाणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली येथील वनविकास महामंडळाच्या सॉ मिलमध्ये सागवान लाकडाची कटाई करून ते अयोध्येकडे घेऊन जाण्यासाठी तयार ठेवण्यात आले आहे.

अयोध्येत रामभक्तांचे स्वप्नातील मंदिर प्रत्यक्षात येत असताना गडचिरोलीच्या सागवानाला राम मंदिरासाठी द्वार होण्याचे भाग्य मिळाले आहे. काष्ठ पूजनासाठी चंद्रपुरातदेखील विशेष तयारी करण्यात आली आहे.

अयोध्येतील राम मंदिर पूर्ण पूर्णत्वास येत असताना त्याच्या मुख्य द्वारासाठी गडचिरोलीतून सागवान लाकूड घेऊन जाण्यात येणार आहे.

देशातील सर्वोत्तम सागवान लाकडाची पाहणी करून गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली परिसरात असलेले सागवान लाकूड दर्जेदार मानले गेले.

हे मंदिर उभारणाऱ्या कंपनीच्या तज्ज्ञांनी या लाकडाला मान्यता दिली आहे. तर आता अयोध्येतील राम मंदिराच्या मुख्य द्वाराचे काम याच लाकडाच्या माध्यमातून केले जाणार आहे.

वनविकास महामंडळाच्या आलापल्ली येथील सॉ मिलमध्ये हे लाकूड कापून तयार असून हे चंद्रपूर-नागपूर मार्गे अयोध्येकडे रवाना केले जाणार आहे.

कोट्यावधी रामभक्तांचे स्वप्नातील मंदिर मूर्त रूपात येत असताना त्यासाठी लागणारे लाकूड आलापल्ली येथून जावे हे देखील गडचिरोलीकरांसाठी भाग्याचे ठरले असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

तिकडे चंद्रपुरात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काष्ठपूजन सोहळ्याची जोरदार तयारी चालवली असून चंद्रपुरात 29 मार्च रोजी यानिमित्त दिवसभर स्वागत सोहळा व काष्ठ पूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.