Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कमांडोंच्या भत्त्यात दुपटीने वाढ; भत्ता चार हजारांवरून आठ हजारांवर

गडचिरोलीमधील नक्षलग्रस्त भागात लढणाऱ्या कमांडोंच्या भत्त्यात वाढ करण्यात आली आहे. त्यांना पूर्वी चार हजार रुपये इतका भत्ता मिळायचा आता त्यांना आठ हजार रुपये इतका भत्ता मिळणार आहे.

कमांडोंच्या भत्त्यात दुपटीने वाढ; भत्ता चार हजारांवरून आठ हजारांवर
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Jun 17, 2022 | 10:26 AM

मुंबई : गडचिरोलीमधील (Gadchiroli) नक्षलग्रस्त भागात लढणाऱ्या कमांडोंच्या (Commando) भत्त्यात (Allowance) वाढ करण्यात आली आहे. सरकारची नक्षलवाद्यांविरोधात मोहीम सुरू आहे. या मेहिमेचा भाग असलेल्या सी-60 पथकातील कमांडोंच्या भत्त्यात दुप्पट वाढ करण्यात आली आहे. कमांडोंच्या भत्त्यात वाढ करण्यात आल्याची घोषणा राज्याच्या गृह विभागाकडून करण्यात आली आहे. गृह विभागाच्या या निर्णयानुसार आता सी-60 पथकातील कमांडोंना मिळणारा मासिक भत्ता आठ हजार रुपये इतका होणार आहे. पूर्वी तो चार हजार रुपये इतका मिळत होता. यामुळे नक्षलवाद्यांविरोधात सुरू असलेल्या चळवळीला आणखी बळ मिळेल असे गृह विभागाने म्हटले आहे. नक्षलवादी चळवळीचा बिमोड करण्यासाठी सरकारकडून विशेष अभियान चालवले जात आहे. या अभियानात सी-60 पथकातील कमांडोंची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. त्यामुळे या कमांडोंच्या भत्त्यात वाढ करण्यात आली आहे. ही भत्त्यात झालेली वाढ केवळ सी-60 पथकातील कमांडोंनाच लागू झाली असून, इतर कमांडोंना याचा लाभ मिळणार नसल्याचे देखील गृह मंत्रालयाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

नक्षलवाद्यांविरोधातील मोहिमेला बळ मिळणार

नक्षलवाद्यांचा बिमोड करण्यासाठी सरकारच्या वतीने विशेष मोहीम सुरू आहे. या मोहिमेत सी-60 पथकातील कमांडोंना सहभागी करण्यात आले आहे. हे कमांडो दुर्गम नक्षलवादी भागात तैनात करण्यात आले आहेत. पूर्वी या कमांडोंना चार हजार इतका मासिक भत्ता मिळायचा. त्यामध्ये आता वाढ करण्यात आली आहे. भत्ता दुपटीने वाढवण्यात आला आहे. आता इथूनपुढे या पथकातील कमांडोंना चार हजारांऐवजी आठ हजार रुपये भत्ता मिळणार आहे. यामुळे नक्षलवाद्यांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेला अधिक बळ मिळणार असल्याचे गृह विभागाने म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

काय आहे सी-60 पथक?

पूर्वी गडचिरोली आणि चंद्रपूर असे दोन मिळून एक जिल्हा होता. या भागात घनदाट जंगले आहेत. नक्षलवाद्यांना या भागाची संपूर्ण माहिती असल्यामुळे नक्षलवादी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन सहज पसार होत होते. या भागात नक्षलवाद्यांनी धुमाकूळ घातला होता. नक्षलवाद्यांचा बंदोबस्त करण्यासाठी 1990 ला एका पथकाची स्थापना करण्यात आली. या पथकामध्ये सुरुवातीला 60 कमांडोंचा समावेश असल्याने या पथकाला सी -60 म्हणून ओळखले जाऊ लागले. या कमांडोंना नक्षलवाद्यांविरोधात लढण्यासाठी विशेष असे प्रशिक्षण देण्यात आले होते. सध्या स्थितीमध्ये या पथकात एक हजारांहून अधिक कमांडोंचा समावेश आहे.

'हात पुढे कराल आणि भविष्यात..', योगेश कदम यांचा राज ठाकरेंना सल्ला
'हात पुढे कराल आणि भविष्यात..', योगेश कदम यांचा राज ठाकरेंना सल्ला.
बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे
बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे.
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने.
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम.
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी.
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले.
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी.
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे.
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला.