Mahaparinirvan Day Live | डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा 64 वा महापरिनिर्वाण दिन, राज्यपाल कोश्यारींसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून अभिवादन

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज (6 डिसेंबर) 64 वा महापरिनिर्वाण दिन आहे.(Dr Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Day Live Update)

Mahaparinirvan Day Live | डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा 64 वा महापरिनिर्वाण दिन, राज्यपाल कोश्यारींसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून अभिवादन
Follow us
| Updated on: Dec 06, 2020 | 8:50 AM

मुंबई : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांचा आज (6 डिसेंबर) 64 वा महापरिनिर्वाण दिन आहे. दरवर्षी यानिमित्ताने लाखो अनुयायी दादरच्या शिवाजी पार्कवरील चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी गर्दी करतात. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चैत्यभूमीवर न येता प्रत्येकाने घरात राहून डिजीटल माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे, असे आवाहन राज्य सरकारसह पालिकेकडून करण्यात आले आहे. (Dr. Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Day Live Update)

?LIVE UPDATE?

[svt-event title=”मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अजित पवार, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन ” date=”06/12/2020,8:16AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह अजित पवारांकडून अभिवादन” date=”06/12/2020,8:15AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राजगृह, दादर येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण” date=”06/12/2020,7:49AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना घरातूनच अभिवादन करा, पालिकेचे आवाहन ” date=”06/12/2020,7:49AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

(Dr. Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Day Live Update)

आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सकाळी 8 वाजता चैत्यभूमीवर अभिवादन करतील. यावेळी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंही उपस्थित असणार आहेत. तर आरपीआयचे नेते रामदास आठवले हे देखील चैत्यभूमीवर येत अभिवादन करणार आहेत. त्याशिवाय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सकाळी 11 वाजता अभिवादन करतील.

दरम्यान चैत्यभूमी परिसरात गर्दी होऊ नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त पाहायला मिळत आहे. दादरमध्ये ठिकठिकाणी नाकाबंदी केली आहे. महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवरील मानवंदना, अभिवादन आणि दर्शनाचे थेट प्रक्षेपण, विविध माध्यमातून ऑनलाईन दर्शन, स्मारकावर हेलिकॉप्टरद्वारे पृष्पवृष्टी यांसह विविध सुविधा यांचे नियोजन करण्यात आली आहे.

थेट प्रक्षेपण पाहता येणार

चैत्यभूमीवरील सर्व कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण महापालिकेच्या समाजमाध्यम खात्यांवरून आणि दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून करण्यात येणार आहे. दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवरून सकाळी 7.45 ते 9 या कालावधीमध्ये शासकीय मानवंदना आणि हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात येईल. त्यानंतर, सकाळी 9.50, 10.50, 11.50 तसेच दुपारी 12.50 वाजता थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. महापरिनिर्वाणदिनी सोशल मीडियावरून ऑनलाईन थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे.

चैत्यभूमीवर गर्दी न करण्याचे आवाहन

“चैत्यभूमीवर गर्दी न करता डॉ. बाबासाहेब यांना अभिवादन करण्यासाठी ज्या-ज्या काही गोष्टी करायच्या, त्या सर्व केल्या जातील. त्यामध्ये कुठेही कमीपणा येऊ दिला जाणार नाही. यापूर्वीही आपण सर्व सणवार साधेपणाने साजरे केले आहे. डॉ. बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण हा गांभीर्याने आणि अभिवादन करण्याचा प्रसंग आहे. त्यामुळे या कठीण काळात आपण जिथे आहात, तिथूनच डॉ. बाबासाहेब यांना अभिवादन करा,” असेही आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. (Dr Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Day Live Update)

संबंधित बातम्या : 

जिथे आहात, तिथूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करा; चैत्यभूमीवर गर्दी नको : मुख्यमंत्री 

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.