नाशिकमध्ये तणावाचे वातावरण! आंबेडकर प्रेमी का संतापले ? सुरू केलं आंदोलन
नाशिकच्या नाशिकरोड परिसरात जय भवानी रोड येथे नव्याने उद्यान केले जात आहे. याच ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धाकृती पुतळा बसविण्यात आला होता.
मनोहर शेवाळे, नाशिक : नाशिकच्या नाशिकरोड विभागातील जय भवानी रोड परिसरात नव्याने उभारण्यात येणाऱ्या उद्यानात विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धाकृती पुतळा बसविण्यात आला होता. मात्र, हा पुतळा बसवताना पालिकेची पूर्व परवानगी घेतली नसल्याने पालिकेने मध्यरात्री पोलीस बंदोबस्तात हा पुतळा हटवल्याने आंबेडकर प्रेमी संतप्त झालेले आहे. आंबेडकर प्रेमींनी आज पुतळा जेथून हटविला त्या ठिकाणी आंदोलन सुरू केले आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा पुन्हा या ठिकाणी बसवत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशाराही आंदोलन कर्त्यांनी दिला आहे. दरम्यान या आंदोलनाच्या ठिकाणी पोलिसांचाही मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस आणि आंदोलन करते आमने-सामने आल्याचे चित्र पाहायला मिळत असून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नाशिकच्या नाशिकरोड परिसरात जय भवानी रोड येथे नव्याने उद्यान केले जात आहे. याच ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धाकृती पुतळा बसविण्यात आला होता.
नाशिक महानगर पालिकेच्या नाशिकरोड विभागाच्या अतिक्रमण विभागाने पोलीस बंदोबस्तात रात्रीच्या वेळी हा अर्धाकृती पुतळा हटविला आहे.
याच मुद्द्यावरून नाशिकरोड परिसरात आंबेडकर प्रेमी आक्रमक झाले आहे, हळूहळू आंबेडकर प्रेमी जमायला सुरुवात झाली असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
जो पर्यन्त पुन्हा पुतळा बसविला जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असून येथून एकही आंबेडकर प्रेमी हलणार नाही अशी भूमिका आंदोलन कर्त्यांनी घेतली आहे.
त्यामुळे आता प्रशासन विरुद्ध आंबेडकर प्रेमी असा नवा वाद निर्माण झाला असून पोलीसांच्या वतिने आंदोलन शांत करून हा वाद मिटवण्याची भूमिका घेतली जात आहे.
मात्र, मनपाच्या कारवाईवरुणन आंबेडकर प्रेमी आक्रमक झाले आहे. रात्रीच्या वेळी पुतळा हटविण्यात आल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहे.