अदानी-अंबानी 21 व्या शतकातील इंग्रज, भाजप त्यांच्याच हातात देश देतोय : डॉ. गणेश देवी

अडाणी आणि अंबानी हे 21 व्या शतकातील इंग्रज आहेत. भाजपचं सरकार त्यांच्याच हातामध्ये देश देत आहेत, असा आरोप राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष गणेश देवी यांनी केला आहे (Dr Ganesh Devy criticize BJP Adani and Ambani on Farm Bill 2020)

अदानी-अंबानी 21 व्या शतकातील इंग्रज, भाजप त्यांच्याच हातात देश देतोय : डॉ. गणेश देवी
Follow us
| Updated on: Oct 02, 2020 | 4:10 PM

नवी मुंबई : अदानी आणि अंबानी हे 21 व्या शतकातील इंग्रज आहेत. भाजपचं सरकार त्यांच्याच हातामध्ये देश देत आहेत, असा आरोप राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष गणेश देवी यांनी केला आहे (Dr Ganesh Devy criticize BJP Adani and Ambani on Farm Bill 2020). ते वाशी येथील एपीएमसी मार्केटमध्ये व्यापारी आणि शेतकरी प्रतिनिधींशी बोलत होते. “केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी, पणन आणि कामगार विधेयकाला विरोध करण्यासाठी राज्यातील सर्वांनी एकत्र येणे गरजेचं आहे. केंद्र शासनाने आणलेल्या या विधेयकाला राज्य शासनाकडून अंमलबजावणीस नकार देण्यात आला आहे. असं असलं तरी हा कायदा रद्द करण्यासाठी शेतकरी, माथाडी, मापारी, व्यापारी यांनी एकत्र येऊन विरोध करणे आवश्यक आहे,” असा सल्ला त्यांनी उपस्थितांना दिला आहे. हा कायदा रद्द करण्यासाठी एपीएमसीने सर्वोच्च न्यायलयात याचिका दाखल करण्याचीही सूचना डॉ. गणेश देवी यांनी केली.

डॉ. गणेश देवी यांनी केंद सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात राज्यव्यापी यात्रा सुरु केली आहे. ते आज वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी प्रतिनिधी आणि व्यापाऱ्यांशी बोलत होते. यावेळी ते म्हणाले, “केंद्र सरकारचे हे कायदे शेतकरी आणि कामगार विरोधी आहेत. केंद्र सरकाराचे हे कायदे एपीएमसीवर हल्ला आहेत. अदानी आणि अंबानी हे 21 व्या शतकातील इंग्रज आहेत. भाजपचं सरकार त्यांच्याच हातामध्ये देश देत आहे. एपीएमसी मार्केटची लढाई ही देशाची लढाई आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे.”

“एपीएमसीने देखील शेतकऱ्यांची जबाबदारी घेऊन कंपन्याच्या विरोधात लढणे आवश्यक आहे. राज्य शासनाने या विधेयकाच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली आहे. मात्र, तरीही या कायद्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणे आवश्यक आहे. ही याचिका एपीएमसीच करु शकते. त्यामुळे त्यांनी ती लवकरात लवकर करावी. या कायद्याला विरोध करणे हेच राज्यकर्त्यांच्या हिताचे आहे,” असंही गणेश देवी यांनी नमूद केलं.

गणेश देवी यांनी कृषी कायद्यांच्या निषेधार्थ राज्यभरात शेतकरी संवाद यात्रा काढली आहे. त्याचाच भाग म्हणून त्यांनी आज वाशी येथील एपीएमसी मार्केटमध्ये संवाद केला. यावेळी डॉ. गणेश देवी यांनी वाशी एपीएमसी मार्केटमधील कांदा, बटाटा, फळ, भाजी, धान्य आणि मसाला मार्केटची पाहणी केली. यावेळी त्यांनी व्यापारी आणि माथाडी कामगारांशी संवाद साधला. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी एपीएमसीचे संचालक आणि आमदार शशिकांत शिंदे, धान्य मार्केटचे संचालक निलेश बिरा, शिक्षक आमदार कपिल पाटील, सुरेखा देवी, एपीएमसीचे सचिव अनिल चव्हाण, पाचही मार्केटचे उपसचिव, व्यापारी प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

मार्केटची पाहणी झाल्यानंतर कांदा बटाटा मार्केट येथील एपीएमसी प्रशासनाच्या मुख्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये डॉ गणेश देवी यांनी केंद्र सरकाराने मंजूर केलेल्या कायद्यांना एपीएमसीवरील हल्ला म्हटलं. तसेच एपीएमसी मार्केटची लढाई देशाची असून सर्वांनी एकत्र येण्याची गरज व्यक्त केली.

हेही वाचा :

‘केवळ प्रचाराने सत्य लपवता येणार नाही, लोकांच्या विचारशक्तीवर माझा विश्वास’, गणेश देवींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

विद्यार्थ्यांना 50 गुणांचा संविधान अभ्यासक्रम अनिवार्य करा, महाराष्ट्रातील विचारवंतांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

स्त्रियांना बंधनात ठेवण्याच्या विचारांचा कॅन्सर झालेल्या सरकारशी लढावं लागेल : डॉ. गणेश देवी

व्हिडीओ पाहा :

Dr Ganesh Devy criticize BJP Adani and Ambani on Farm Bill 2020

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.