पतंजलीच्या औषधाने कोरोना बरा होत नाही : अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे

कोरोनील औषधामुळे कोरोना बरा होतो असा संभ्रम निर्माण केल्यास पतंजलीवर कठोर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. (Dr Rajendra Shingane on Coronil Medicine).

पतंजलीच्या औषधाने कोरोना बरा होत नाही : अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे
Follow us
| Updated on: Jul 03, 2020 | 9:26 PM

मुंबई : योगगुरु बाबा रामदेव यांच्या पतंजलीने बाजारात आणलेल्या कोरोनील नावाच्या औषधाने कोरोना बरा होत नाही. या औषधामुळे कोरोना बरा होतो असा पतंजलीने संभ्रम निर्माण केल्यास किंवा जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल (Dr Rajendra Shingane on Coronil Medicine). गृह विभागाच्या मदतीने औषधे आणि जादूटोणा उपाय (आक्षेपार्ह जाहिराती) कायदा 1954 नुसार पतंजलीवर कारवाई केली जाईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिला.

राजेंद्र शिंगणे म्हणाले, “पतंजलीच्या कोरोनील या औषधामुळे जनतेमध्ये कोरोना बरा होतो असा संभ्रम निर्माण करुन त्यांची दिशाभूल होत आहे. प्रत्यक्षात पतंजलीने तयार केलेले कोरोनील हे औषध अश्वगंधा, तुळस व गुळवेल वापरुन तयार केलेली गोळी (टॅब्लेट) आहे. तिचा उपयोग रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी होतो. आयुष मंत्रालयाने सुद्धा रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी वरील औषधाची अश्वगंधा, तुळस, गुळवेल हे घटक समाविष्ट असल्याने शिफारस केली आहे. मात्र, प्रत्यक्षात यामुळे कोरोना बरा होत नाही.”

“कोरोनील हे औषधासाठी दिलेले नाव (कोरोना+निल) आणि प्रसार माध्यमातून होत असलेल्या जाहिरातींमुळे जनतेची दिशाभूल होत आहे. तसेच संभ्रम निर्माण होत आहे. कोरोनीलचा वापर फक्त रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे औषध म्हणून केला जाऊ शकतो. या औषधामुळे कोरोना बरा होत नाही याची नागरिकांनी नोंद घ्यावी,” असं आवाहन डॉ. शिंगणे यांनी केलं.

पतंजलीकडून कोरोनावरील Coronil औषध लाँच, 7 दिवसात रुग्ण बरा होण्याचा दावा

दरम्यान, योगगुरु रामदेव बाबा यांनी कोरोना विषाणूच्या संसर्गावर पहिलं आयुर्वेदिक औषध शोधल्याचं जाहीर केलं होतं. (Ramdev Baba launch Coronil Corona Medicine). या औषधामुळे 100 टक्के रुग्ण बरे होतात आणि 0 टक्के मृत्यूदर असल्याचाही दावा रामदेव बाबा यांनी केला होता. त्यांनी हरिद्वार येथे या औषधाचं उद्धाटन केलं होतं. श्वासारी वटी कोरोनील असं या औषधाचं नाव आहे.

“क्लिनिकल कंट्रोल ट्रायलचा केला. यात पतंजली आणि नॅशनल इस्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्स (निम्स, जयपूर) या संस्थांचा सहभाग होता. हा अभ्यास 100 लोकांवर करण्यात आला. यात 3 दिवसांमध्ये 69 टक्के रुग्ण बरे झाले. ही इतिहासातील मोठी घटना आहे. ज्या लोकांची पचनशक्ती खराब आहे त्यांना पतंजलीने हे औषध शोधल्याची बातमी पचणार नाही. 3 दिवसांध्ये 69 टक्के रुग्ण बरे होतात, तर 7 दिवसांमध्ये 100 टक्के रुग्ण बरे होतात. यात एकाही रुग्णाचा मृत्यू होत नाही. 100 टक्के रिकव्हरी आणि 0 टक्के मृत्यूदर असं या औषधाचं वैशिष्ट्ये आहे,” असं रामदेव बाबा यांनी सांगितलं.

“100 टक्के रुग्णांची रिकव्हरी, एकाही रुग्णाचा मृत्यू नाही”

रामदेव बाबा म्हणाले, “आज आम्ही कोरोनील आणि श्वासारीचं लाँचिंग करत आहोत. या औषधांवर आम्ही दोन प्रयोग केले. एक ‘क्लिनिकल कंट्रोल स्टडी’ आणि दुसरा ‘क्लिनिकल कंट्रोल ट्रायल’. पहिला प्रयोग देशभरातील विविध शहरांमध्ये करण्यात आला. आम्ही 280 रुग्णांचा यात समावेश केला. याचा निकाल अप्रतिम होता. यात 100 टक्के रुग्णांची रिकव्हरी झाली. एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. आम्ही सिप्टेमेटिक उपचारासोबत सिस्टमेटिक उपचार देखील केले. यातून आम्ही कोरोनाची गुंतागुंत असतानाही त्याला नियंत्रित केलं.”

हेही वाचा :

‘पतंजली’ कोरोनील औषधाच्या जाहिरातीवर आयुष मंत्रालयाची बंदी

Patanjali Coronil | ‘कोरोनिल’ची कोरोनाग्रस्तांवर चाचणी, आरोग्य विभागाची रुग्णालयाला नोटीस

पतंजलीने आमच्याकडे तर फक्त ताप-खोकल्यावरील औषधाचा परवाना मागितला : उत्तराखंड आयुर्वेद विभाग

Coronil | महाराष्ट्रात नकली औषधांच्या विक्रीला परवानगी नाही, गृहमंत्र्यांचा रामदेव बाबांना थेट इशारा

Dr Rajendra Shingane on Coronil Medicine

'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...