Alcohol Party : नाशिकमधील महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयाचा झिंगाट कारभार; कर्मचाऱ्यांची मद्य पार्टी अन् रूग्ण वाऱ्यावर

रुग्णालयात गेल्या दोन दिवसांपासून रात्री पासून तर पहाटे पर्यंत 'द इंवेस्टीगेशन' या चित्रपटाचे शूटींग सुरू होते. यामुळे रुग्णांना प्रचंड मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागला. तर दुसरीकडे रूग्णालयातील कर्मचारी हे मद्यपान करत होते. त्यांच्याहीमुळे रुग्ण आणि नातेवाईक यांना त्रास सोसावा लागला.

Alcohol Party : नाशिकमधील महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयाचा झिंगाट कारभार; कर्मचाऱ्यांची मद्य पार्टी अन् रूग्ण वाऱ्यावर
मद्य पार्टीImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 29, 2022 | 4:06 PM

नाशिक : येथील महापालिकेच्या झाकीर हुसैन रुग्णालयात (Zakir Hussain Hospital) धक्कादायक प्रकाराची मालिका सुरूच असल्याचे आज पुन्हा एकदा समोर आले आहे. येथील ऑक्सिजन गळती दुर्घटनेचे (Oxygen Leak Accident) घाव अजूनही भरलेले नसताना रुग्णालयात सिनेमाच्या शूटींगसाठी परवानगी देण्यात आल्याचे उघड झाले आहे. तसेच शूटींग (Movie Shooting) सुरू असताना कर्मचारी पाहण्यात देग होते. तर रूग्ण वाऱ्यावर सोडण्यात आल्याचे एकंदरीत चित्र होते. तर या दरम्यान रुग्णालयात काहींनी मद्यप्राशनही केल्याचा धक्कादायक प्रकारही उघडकीस आला आहे. यामुळे आधीच अडचणीत सापडलेल्या झाकीर हुसैन रुग्णालयावर प्रश्न चिन्ह उभे राहत आहेत. तर सी.सी.टीव्ही तपासून दोषींवर कारवाई करण्याचे आदेश मनपा आयुक्तांनी दिल्याचे मनपा वैद्यकीय अधीक्षक यांनी सांगितलं आहे.

वर्षभारापुर्वी ऑक्सिजनची गळती

येथील महापालिकेच्या झाकीर हुसैन रुग्णालयात वर्षभारापुर्वी ऑक्सिजनची गळती दुर्घटनेत 22 पेक्षा जास्त रुग्ण दगावले होते. त्यामुळे राज्यासह देशात या रूग्णालयाची बदनामी झाली होती. या घटनेवर अजुनही चर्चा होत आसताना पुन्हा येथे धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथे एका चित्रपटाचे चित्रीकरण करत असताना रूग्णालयातील काही कर्मचारी ईमर्जन्सी वार्डमध्येच बुधवारी रात्रीच्या सुमारास मद्य पार्टी करत असल्याचे उघड झाले.

शूटींग पाहण्यात कर्मचारी गुंग

तर रुग्णालयात गेल्या दोन दिवसांपासून रात्री पासून तर पहाटे पर्यंत ‘द इंवेस्टीगेशन’ या चित्रपटाचे शूटींग सुरू होते. यामुळे रुग्णांना प्रचंड मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागला. तर दुसरीकडे रूग्णालयातील कर्मचारी हे मद्यपान करत होते. त्यांच्याहीमुळे रुग्ण आणि नातेवाईक यांना त्रास सोसावा लागला. त्याचबरोबर चित्रपटाचे शूटींग पाहण्यात कर्मचारी गुंग झाल्याने रूग्णांकडे त्यांचे लक्ष नव्हते. त्यावेळी कोणी औषधासाठी तर कोणी सलाईनसाठी या कर्मचाऱ्यांना हाका मारत होते. परंतू या कडे कोणी लक्ष देत नसल्याचे रुग्णांनी व त्यांच्या नातेवाईकांनी सांगितलं आहे. तसेच प्रत्यक्षदर्शी असलेल्या व्यक्तीने देखील हा घडलेला प्रकार खरा असल्याचे सांगितलं आहे.

हे सुद्धा वाचा

दोषींवर कारवाई करण्याचे आदेश

त्यावेळी त्या प्रत्यक्षदर्शीने सांगितलं की, या रुग्णालयात सुमारे 120 लोकांचा समूह चित्रपटाचे चित्रीकरणाचे काम करत होते. यामुळे रुग्णालयात मोठ्याप्रमाणात आरडाओरड आणि आदळआपटं होण्याचे आवाज चालू होते. ज्यामुळे रुग्णालयातील शांततेचा भंग झाला. त्यावर मनपा वैदयकीय अधीक्षकांना विचारले असता, त्यांनी रुग्णालयात शूटिंगला परवानगी देतांना रुग्णांना व प्रशासनाला त्रास होऊ नये अशा सूचना दिल्या होत्या. तर रुग्णालयात त्या दरम्यान झालेल्या मद्य पार्टीचे सी. सी.टीव्ही तपासून दोषींवर कारवाई करण्याचे आदेश मनपा आयुक्तांनी दिल्याचे मनपा वैदयकीय अधीक्षक डॉ.बापू साहेब नागरगोजे यांनी सांगितलं. तर या मद्यपार्टीच्या प्रकारामुळे आणि चित्रपटाच्या चित्रीकरणामुळे रूग्णाना झालेला त्रास बगता पालिका प्रशासन कोणावर काय कारवाई करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे

सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....