Mira Bhayander and Bhiwandi: मीरा-भाईंदर भिवंडी पालिकेचा प्रारूप आराखडा प्रसिद्ध ; प्रभागतोडफोड झाल्याने प्रस्थापितांची धावपळ सुरु; प्रत्येकी अकरा नगरसेवक वाढले
प्रभागांच्या सीमा रेशनमध्ये मोठे बदल झाले आहेत. सर्वच प्रभागांची पुनर्रचना करण्यात आली आहे. आत्ताचा प्रभागांची संख्या 24 असून त्यात नवया आराखड्यांनुसार त्यात वाढ होऊन 35 इतकी झालीआहे
भिवंडी – मुंबई महानगरपालिकेनंतर आता मीरा भाईंदर आणि भिवंडी पालिकेच्या (Mira Bhayander and Bhiwandi Municipalities)निवडणुकीचे बिगुलही वाजले आहे.विविध राजकीय पक्षांनी तसेच ईच्छुक उमेदवार निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत.2022 च्या पंचवार्षिक महानगरापलिका निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने(State Election Commission) निवडणूक प्रक्रियेला सुरुवात केली आहे. भिवंडी महापालिकेच्या विद्यमान सभागृहाची मुदतनुकतीच (8 जूनला) संपली आहे. दुसरीकडं मीरा-भाईंदर महापालिकेच्या सभागृहाची मुदत येत्या 27 ऑगस्ट रोजी संपत आहे. या दोन्ही महानगरपालिकांचा प्रभाग रचनेचा प्रारुप आराखडा प्रसिद्ध झाला आहे. नव्या प्रभाग रचनेच्या आराखड्यानुसार दोन्ही महापालिकांमध्ये प्रत्येकी अकरा नगरसेवक (Corporator)वाढले आहेत .
नगरसेवकांच्या संख्येत वाढ
नव्यानं प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रभाग रचनेच्या प्रारूप आराखड्यामुळे पूर्वीच्या प्रभागात मोठ्याप्रमाणात बद्दल झाले आहेत. प्रभाग रचना आराखड्यातील जुन्या प्रभागांच्या सीमा रेशनमध्ये मोठे बदल झाले आहेत. सर्वच प्रभागांची पुनर्रचना करण्यात आली आहे. आत्ताचा प्रभागांची संख्या 24 असून त्यात नवया आराखड्यांनुसार त्यात वाढ होऊन 35 इतकी झालीआहे , तर नगरसेवकांची संख्या 95 वरून थेट 106 इतकी झाली आहे.
अकरा प्रभागांची वाढ
भिवंडी महानगरपालिका 2017 मध्ये पार पडलेल्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीची मुदत आठ जून रोजी संपुष्टात येत असून 9 जून 2022 पासून प्रशासकीय राजवट सुरू होत आहे प्रभाग संख्या 90 आहे आता यामध्ये 11 प्रभागांनी वाढ झाली आहे. नव्याने राबवण्यात आलेल्या प्रभाग रचनेमुळे अनेक भिवंडी व मीरा भाईंदर या दोन्ही महापालिकेत तोडफोड प्रस्थापितांच्या प्रभागांची तोडफोड झाली आहे. त्यामुळे प्रस्थापितांसह , इच्छुकांना नव्या प्रभाग रचनेत लक्ष घालावे लागणार आहे. प्रसिद्ध करण्यात आलेला महापालिकेच्या कच्चा प्रारूप आराखडा पालिका मुख्यालयात सह सर्व प्रभाग कार्यालयात पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे
अशी असेल निवडणूक
- त्रिसदस्यीय पॅनल पद्धतीने निवडणूक होईल .
- मीरा-भाईंदर शहरातील नगरसेवक असलेले 34 प्रभाग असतील
- एक प्रभागात 4 नगरसेवकांचा राहणार आहे.
- भिवंडी भिवंडी मध्ये तीन नगरसेवकांचे 30 प्रभाग.
- दोन नगरसेवकांचा एक प्रभाग असेल